Satara Rain : जिल्ह्यातील धरण क्षेत्रात किती पाऊस? कोणत्या धरणात किती पाणीसाठा? पहा ताजी आकडेवारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Satara News : महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांना हवामान विभागाने आज रेड अलर्ट दिला होता. यामध्ये रायगड, सिंधुदुर्ग, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांचा समावेश होता. आज दिवसभर सातारा जिल्ह्यातील पाटण, जावळी, महाबळेश्वर या तालुक्यांत मुसळधार पाऊस झाला. सातारा जिल्ह्यातील धरण क्षेत्रात किती पाऊस? कोणत्या धरणात किती पाणीसाठा? याबाबतची ताजी आकडेवारी आम्ही तुम्हाला येथे सांगणार आहोत. Satara rain

सातारा जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण 84.97 अब्ज घन फूट पाणी साठा असल्याचे उपकार्यकारी अभियंता, कृष्णा सिंचन विभाग, सातारा यांनी कळविले आहे. जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा पुढीलप्रमाणे असून सर्व आकडे अब्ज घन फूटमध्ये आहेत. कंसामध्ये धरणसाठ्याची टक्केवारी दिली आहे.

मोठे प्रकल्प –
कोयना – 55.82 (55.75) Koyana Dam Water Level
धोम – 6.92 (59.20)
धोम – बलकवडी – 3.36 (84.85)
कण्हेर – 4.98 (51.93)
उरमोडी -4.88 (50.57)
तारळी – 5.03 (86.13).

मध्यम प्रकल्प –
येरळवाडी – 0.01 (1.45)
नेर – 0.08 (19.47)
राणंद – 0.00 (0.44)
आंधळी – 0.02(08.02)
नागेवाडी – 0.06 (27.14)
मोरणा – 0.91(69.69)
उत्तरमांड – 0.40 (46.51)
महू – 0.88 (80.83)
हातगेघर – 0.35 (140.40)
वांग (मराठवाडी) – 1.27 (46.69)

कोयना धरणाच्या क्षेत्रामध्ये गेल्या चोवीस तासात 130 मि.मी. पावसाची नोंद झाली असून मोरणा मध्यम प्रकल्पाच्या क्षेत्रात 108 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तसेच धोम – 39 मि.मी., धोम – बलकवडी – 68, कण्हेर – 20, उरमोडी – 31, तारळी – 40, येरळवाडी – 3, उत्तरमांड – 25, महू – 63, हातगेघर – 49, वांग (मराठवाडी) – 31, नागेवाडी- 19 मि.मी पाऊस झाला आहे. तर नेर, राणंद, आंधळी धरणाच्या क्षेत्रातील कालचा पाऊस निरंक आहे.