Satara Rain Update : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात बुधवारी पावसाचा कहर पाहायला मिळाला. महाबळेश्वरमध्ये (Mahabaleshwar) चोवीस तासात ३३१ मिलिमीटर इतका विक्रमी पाऊस झाला आहे. नवजामध्ये २७२ आणि कोयनानगरमध्ये २५३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. एका दिवसात पाणलोट क्षेत्रात एकूण ८५६ मिलीमीटर इतका उच्चांकी पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे धरणातील (Koyna Dam) पाण्याची आवक ७५ हजार क्युसेकवर पोहोचली आहे.
मंगळवारी रात्रीपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत होता. बुधवारी दिवसभर पावसाची संततधार होती. यामुळे धरणातील पाण्याची आवक प्रचंड वाढली. कोयनेसह उपनद्यांची पाणी पातळी झपाट्याने वाढत गेली. त्यामुळे पाटण तालुक्यातील काही मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आली. मुसळधार पावसामुळे कोयना धरणातील पाणीसाठा ३७ टीएमसी झाला आहे.
सातारा जिल्ह्यात बुधवारी दिवसभर धो-धो बरसल्यानंतर रात्रीपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे काही प्रमाणात नदी, ओढ्यांच्या पाण्याची पातळी कमी झाली आहे. परंतु, आज सातारा जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.
Koyna Dam
Date: 20/07/2023
Time: 07:00 AM
Water level: 2089′ 08″ (636.930m)
Dam Storage:
Gross: 37.36 TMC ( 35.49%)
Inflow: 74,569 cusecs
Discharges
KDPH: 00 Cusecs.
Total Discharge in koyna River: 00 Cusecs
Rainfall in mm: (Daily/Cumulative)
Koyna: 253/1560
Navaja: 272/2236
Mahabaleshwar: 331/2229