सातारा पोलिसांनी खंडणी प्रकरणातील आरोपींची बसस्थानक परिसरातून काढली धिंड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा बसस्थानक परिसरात एकाला खंडणी मागून त्याच्याकडून जबरदस्तीने मोबाईल काढून घेणार्‍या तिघांची सातारा शहर पोलिसांनी सोमवारी सातारा बसस्थानक परिसरात धिंड काढली.

सातारा बसस्थानक परिसरात रविवारी एका कापड व्यापार्‍याला शस्त्राचा धाक दाखवून खंडणी मागून त्याचा जबरदस्तीने मोबाईल तसेच काही रक्कम काढून घेणार्‍या स्मित पवार, आदेश बनसोडे, गणेश साठे या तीन जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्यावर सातारा शहर आणि शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

तपासाच्या अनुषंगाने पोलिसांनी तिन्ही आरोपींना सोमवारी सातारा बसस्थानक परिसरात आणले होते. त्यानंतर घटनास्थळापासून सातारा शहर पोलीस ठाण्यापर्यंत पोलिसांनी त्यांची धिड काढली. यापुर्वी शिरवळ पोलिसांनी शाळा, कॉलेज परिसरात गुंडगिरी करणाऱ्यांची धिंड काढली होती. त्यानंतर आता सातारा पोलीस देखील ॲक्शन मोडवर आले आहेत.