कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात मोठ्या भक्तिभावाने श्री संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे भाविकांनी दर्शन घेतले. पालखी सोहळा जिल्ह्यात आल्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली होती. पालखी सोहळ्यावेळी चोरीचे प्रकार होणार असल्याचे गृहीत धरत 7 वारकरी वेशातील पथके अंमलदारांसह लक्ष ठेऊन होते. संबंधित वारकरी वेशांतर करून वारीमध्ये बेशिस्तरीत्या वर्तन करताना मिळुन आलेल्या तब्बल 66 इसमांचेवर प्रतिबंधक कारवाई केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात दाखल होताच सोहळ्यामध्ये उपद्रवी इसमांचकडुन अनुचित प्रकार घडु नये. यासाठी स्वत: पोलीस अधिक्षक समीर शेख, तसेच अपर पोलीस अधिक्षक बापु बांगर यांच्याकडून पोलीस कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी त्यांचे अधिपत्याखाली स्वतः तसेच सहा. पोलीस निरीक्षक संतोष पवार, सहा. पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, सहा. पोलीस निरीक्षक आरती नांद्रेकर, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, पोलीस उपनिरीक्षक मदन फाळके असे एकुण 7 वारकरी वेशातील पथके अंमलदारांसह तयार करुन कामकाजाचे नियोजन करण्यात आले होते.
यावेळी तयार केलेल्या पथकाने सातारा जिल्ह्यातील संपूर्ण वारी सोहळ्यात काही व्यक्ती संशयितरीत्या वावरताना तसेच वारीमध्ये बेशिस्तरीत्या वर्तन करताना आढळून आले. त्यानुसार 66 इसमांना ताब्यात घेत त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. श्री संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्या दरम्यान गंभीर स्वरुपाचा अपराध करण्यापासुन प्रतिबंध केले संपूर्ण पालखी सोहळा दरम्यान लोणंद मधील एक चैन चोरी खेरीज कोणताही अनुचित प्रकार न घडता पालखी सोहळा शांततेत व निर्विघ्नपणे पार पाडली.