उधारीचे पैसे मागितले म्हणून तिघांनी चाकू काढत थेट केला खुनाचा प्रयत्न; पण पुढं घडलं असं काही…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । एखाद्याला उधार पैसे दिले तर परत वारंवार मागणाऱ्याचा राग हा उधार घेणाऱ्या व्यक्तीला येतोच. कधी कोण पैसे परत देतो तर कधी कोण देठी नाही. मात्र, उधारीच्या पैशापायी एखाद्याचा जीव घेण्यापर्यंत जाणे हि खूप गंभीर घटना आहे. अशीच घटना सातारा शहरात घडली आहे. जुनी उधारी मागितल्याच्या कारणावरुन चिडून जावून तीन जणांनी एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामध्ये संबंधित व्यक्ती बचावली असून व्यक्तीने हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून तिघा जणांपैकी एकास ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, (दि. 5 जून) सोमवारी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास मोटार सायकलवरुन जात असताना जुनी उधारी मागीतल्याचे कारणावरुन चिडून जावून तीन आरोपींनी एकावर पाठीमागे येवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. याबाबतची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. संबंधित व्यक्तीने फिर्याद दिल्यानंतर याबाबत स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेण्याच्या सुचना वरिष्ठांनी दिल्या होत्या.

त्या अनुशंगाने पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांचे अधिपत्याखाली एक तपास पथक तयार करण्यात आले. दि. 16/06/2023 रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या सूचनेनंतर संबंधित पथकाने आरोपीला वाढे फाटा परिसरात वावरत असताना त्या ठिकाणी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. तसेच पुढील कार्यवाही कामी सातारा शहर पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहे

पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांचे सुचनेप्रमाणे व पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार, रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पोलीस अंमलदार सुधीर बनकर, विश्वनाथ संकपाळ, अतिश घाडगे, विजय कांबळे, संजय शिर्के, साबीर मुल्ला, मुनीर मुल्ला, अमोल माने, दिपाली यादव, शिवाजी भिसे, केतन शिंदे, स्वप्नील दौंड, वैभव सावंत, मोहसीन मोमीन यांनी सदरची कारवाई केली आहे.