सातारा प्रतिनिधी । पोवई नाक्यावर लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा आयलँड उभा करण्यात येणार असून याला सातारकर जनतेचा आणि शिवप्रेमींचा विरोध वाढला आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी बालहट्ट सोडावा अशी मागणी करत नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. हातात बॅनर घेऊन नागरिकांनी पालकमंत्री देसाई यांचा निषेध केला आहे.
शिवतीर्थावर अन्य कोणाचाही आयलँड नकोय. जर साताऱ्यात शिवतीर्थावर इतर कोणाचा आयलँड उभा केला तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा नागरिकांनी दिला आहे. शिवतीर्थावर पुतळा किंवा चौकाला कोणाचे नाव देण्याचा प्रकार समोर येतोय. मात्र आम्ही हे होऊ देणार नाही. गरज पडली तर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
पालकमंत्री शंभुराज देसाईंचा सातार्यात निषेध pic.twitter.com/wcYP4EGsS1
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) June 17, 2023
दरम्यान, सातारा शहरातील पोवईनाक्यावरील एक इंच जागासुद्धा आयलँड आम्ही देणार नाही अशी भूमिका शिवभक्तांनी घेतली आहे. उदयनराजे भोसले समर्थक या प्रकरणानंतर आक्रमक झाले असून पालकमंत्री देसाई यांचा निषेध केला जात आहे.