सातारा प्रतिनीधी । सातारा शहर व परिसरात लावण्यात येणाऱ्या फ्लेक्सच्या माध्यमातून पालिकेच्या उत्पन्नात भर पडू लागली आहे. दि. १ एप्रिल २०२४ पासून आज अखेर सुमारे १५ लाखांचा महसूल पालिकेच्या तिजोरीत जमा झाला असून, दंडात्मक कारवाईतूनही ३० हजारांचा महसूल मिळाला आहे.
शहर व परिसरात फ्लेक्स लावण्यासाठी पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाची रीतसर परवानगी घ्यावी लागते. फ्लेक्सचे आकारमान, तो लावण्याचे ठिकाण, लावण्याचा कालावधीत या बाबी पाहून पालिकेकडून शुल्क आकारणी केली जाते.
दि. १ एप्रिल २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या आठ महिन्यांच्या कालावधीत फ्लेक्सला देण्यात आलेल्या परवानग्यांच्या माध्यमातून पालिकेला सुमारे १५ लाखांचा महसूल मिळाला आहे. दि. ३१ मार्चपर्यंत यामध्ये तीन ते चार लाखांची भर पडेल, अशी माहिती अतिक्रमण विभागाचे प्रमुख प्रशांत निकम यांनी दिली.