साताऱ्यात ‘या’ ठिकाणी फडकणार दुसरा 75 फुटी राष्ट्रीय ध्वज; पालिकेनं दिली खर्चासह प्रशासकीय मंजूरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा पालिकेची नुकतीच अर्थसंकल्सपिय सभा पार पडली. या सभेत सातारा शहरातील अनेक विकासकामांसाठी भरघोस निधींची तरतूद करत प्रशासकीय मंजुरी देखील देण्यात आली. या सभेत दुसऱ्या ७५ फुटी राष्ट्रीय ध्वज उभारणीच्या विषयाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे सातारा शहरात जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाली म्हणून ७५ फुटी राष्ट्रीय ध्वज उभारण्यात आला आहे. त्यानंतर दुसरा तेवढ्याच उंचीचा राष्ट्रीय ध्वज हुतात्मा कर्नल संतोष महाडिक यांच्या स्मारकाच्या ठिकाणी उभारला जाणार आहे.

सातारा जिल्ह्यातील अनेक तरुण आज देशसेवेत कार्यरत असून त्याच्याकडून देशसेवा केली जात आहे. तर आजपर्यंत अनेक सैनिक भारत चीन, भारत पाकिस्तान युद्धात हुतात्मा झाले. अशा जिल्ह्यात सैनिकी सैनिकी परंपरा असल्याने सातारा शहरात ७५ फुटी राष्ट्रीय ध्वज उभारण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असलेल्या हुतात्मा कर्नल संतोष महाडिक यांच्या स्मारक शहरात व्हावे यासाठी खूप प्रयत्नम येथील माजी सैनिकांच्या वतीने करण्यात आले. सुरुवातीला जागा मिळत नव्हती. कालांतराने आर्युवेदीक गार्डनला जागा मिळाली पण हुतात्मा कर्नल संतोष महाडिक यांच्या स्मारकासाठी पालिकेला जागेसाठी शोध घ्यावा लागला.

माजी सैनिक शंकर माळवदे यांनी स्मारकासाठी सातत्याने पाठपुरावा केला आणि हुतात्म स्मारकालगतच्या जागेत हुतात्मा कर्नल संतोष महाडिक यांच्या स्मारकाचे काम सुरु झाले. हे काम आता पूर्णत्वास येत आहे. दरम्यान, या स्मारकाच्या ठिकाणी राष्ट्रीय ध्वज उभारणीचा निर्णय पायिकेच्या वतीने घेण्यात आला. दि. ७ मार्चच्या पालिकेच्या प्रशासकीय सभेत विषय क्रमांक ८१ हा हुतात्मा कर्नल संतोष महाडिक स्मृती उद्यान येथे विविध कामे करण्यासाठी येणाऱ्या खर्चास व कामास मंजूरी देण्यात आली.

राष्ट्रीय ध्वज उभारणीच्या कामासाठी पालिकेकडून निधीस मंजुरी : अभिजित बापट

नुकत्याच पार पडलेल्या पालिकेच्या सभेत दूसरा राष्ट्रीय ध्वज हुतात्मा कर्नल संतोष महाडिक यांच्या स्मारकाच्या ठिकाणी उभारण्याच्या विषयाला मंजुरी देण्यात आली आहे. याच परिसरात दुसरी बाग विकासीत करण्यात येणार आहे. राष्ट्रीय ध्वज उभारण्यासाठी नगरपालिकेने २७ लाख ६१ हजार ८०८ रुपयांची तरतुद केली आहे. मात्र, आता काही दिवसात आचारसंहिता लागणार असून त्यानंतर प्रत्यक्ष कमला सुरुवात केली जाईल, अशी माहिती सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना दिली.