सातारा प्रतिनिधी | सातारा पालिकेतील कर्मचाऱ्यांनी गुरुवारी दिवसभर काम बंद आंदोलन केले. परिणामी, दैनंदिन कामासाठी आलेल्या नागरिकांचा मोठा खोळंबा झाला. माजी नगरसेवकाने पालिका कर्मचाऱ्यास दमदाटी आणि शिवीगाळ केल्याचा दावा पालिका कर्मचाऱ्यांनी केला आहे.
गोडोलीतील बागडवाड्यात दोन ठिकाणी कार्यक्रम असल्याने तेथील स्थानिकांच्या मागणीनुसार नगरसेवक शेखर मोरे-पाटील यांनी पालिकेच्या वाहतूक विभागाकडे पाण्याच्या टँकरची मागणी केली होती. मागणी करुनही टँकर पोहोच न झाल्याने शेखर मोरे पाटील हे पालिकेत गेले. तेथे त्यांचा आणि वाहतूक विभागाचे प्रमुख प्रशांत निकम यांच्यात सुरुवातीला शाब्दीक झाली, नंतर धक्काबुक्की झाली, असा आरोप प्रशांत निकम यांनीच केला. त्याचे पडसाद दुसऱ्या दिवशी उमटले.
आंदोलनाची माहिती मुख्याधिकारी अभिजित बापट यांना कर्मचारी स संघटनेच्यावतीने देण्यात आली. दरम्यान, शेखर मोरे-पाटील यांच्यावर झालेल्या आरोपाच्या निषेधार्थ आणि पालिकेच्या विरोधात गोडोलीकर मोर्चा काढणार आहेत, असे स्थानिकांनी सांगितले. त्यामुळे हा वाद पाण्यावरुन पेटला आहे.