सातारा प्रतिनिधी । साताऱ्याचे भाजप खासदार उदयनराजे भोसले हे काहीना काही कारणावरून चर्चेत येतात. सध्या जाते त्यांच्या दिल्लीवारीवरून चांगलेच चर्चेत आले आहेत. कारण सातारा जिल्ह्यातील अनेक प्रश्न, प्रलंबित विकासकामावरून त्यांच्याकडून दिल्लीतील विविध खात्याच्या केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेतल्या जात आहरेत. कामांबाबत पाठपुरावा केला जात आहे. त्यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा याची भेट घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे देशाची राजधानी दिल्ली येथे भव्य राष्ट्रीय स्मारक उभारणेत यावे, महापुरुषांची बदनामी करणा-यांस जबर शासन होणेसाठी सुसंगत कडक कायदा करावा यासह अनेक मागण्या खा, उदयनराजेंनी शहांकडे केल्या आहरेत.
खा. उदयनराजे भोसले यांनी गृहमंत्री शहा यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी त्यांनी पर्यटन मंत्रालयामार्फत शिवस्वराज्य सर्किट विकसित करावे, या प्रमुख मागण्यांसह ऐतिहासिक घटना रंगवणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा अधिकृत इतिहास केंद्र आणि राज्य शासनामार्फत प्रसिद्ध करावा. ऐतिहासिक चित्रपटांना परवानगी देताना इतिहास तज्ज्ञांच्या कमिटीची मान्यता घेण्याचे बंधन घालावे.
दिल्लीचे तख्त राखणा-या स्वराज्याचे संस्थापक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे वैशिष्टयपूर्ण स्मारक उभारण्याचे काम केंद्रसरकारने हाती घ्यावे. तसेच ऐतिहासिक कालखंडातील प्रसंगांचे मुल्य अधिकृत ठरवण्यासाठी उच्च स्तरीय समिती नेमुन पुरातत्व विभागाच्या वतीने प्रसिध्दी झालेले अप्रसिध्द राहीलेले दस्तावेज, चित्रे,शस्त्रागाराची माहिती इत्यादी विषयांवर नव्याने अभ्यास करून अधिकृत इतिहास शासनाने प्रसिध्द करावा, तसेच ज्या विदेशातील सरकारकडे अशे दस्तावेज सापडतील ते भारतामध्ये आणण्यसाठी प्रयत्न करावेत.
अलीकडच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज व अन्य महापुरुषांच्या बाबतीत अवमानजनक वक्तव्ये केली गेली त्यामधुन समाजिक तेढ निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यासबंधी कायदेतज्ञांची मदत घेऊन अश्या घटना घडु नयेत व महापुरुषांच्या बाबतीत अवमानजनक वक्तव्य केल्यास कडक शिक्षेची तरतुद असलेला कायदा संसदेत पारीत करावा तसेच ऐतिहासिक चित्रपटांच्या माध्यमातुन अनेक वेळा इतिहासाची मोडतोड करून मांडणी केली जाते असल्याचे अनेक वेळा इतिहास तज्ञांनी आमच्या निदर्शनास आणून दिले आहे.
चित्रपटांसाठी नियंत्रण ठेवणारी सेन्सॉर कमिटी स्थापन करावी
त्यामुळे अश्या प्रकारांना आळा बसावा व नागरिकांना दिशाभूल करणाऱ्या घटना दाखवण्यास प्रतिबंध व्हावा जेणेकरूण समाजामध्ये दुफळी निर्माण होऊ नये व सामाजिक सलोख्यास धक्का लागू नये म्हणून ऐतिहासिक घटनांवर आधारित चित्रपटांसाठी नियंत्रण ठेवणारी सेन्सॉर कमिटी स्थापन करावी, केंद्राने अधिकृत ठरविलेला इतिहासच शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये प्रसिध्द होईल, ज्यामुळे इथुन पुढे असे शालेय पाठ्यपुस्तकात चुकीचा इतिहास छापल्याने वादविवाद होणार नाहीत अशी आग्रही मागणी शहा यांचेकडे यावेळी केली.
मराठयांच्या इतिहासांच्या पाऊलखुणा असलेली सर्व ठिकाणे जगापर्यंत पोहचणार
दरम्यान, केंद्रीय पर्यटन मंत्र्याची भेट घेऊन स्वदेश योजने अंतर्गत बुदध सर्किट, रामायण सर्किट यासांरखी सर्किट विकसित केली जात असलेने याच धर्तीवर शिवस्वराज्य सर्किट विकसित केले जाव अशी मागणी आम्ही नुकतीच केली आहे, याकामी पर्यटन मंत्रालयाला आपल्या स्तरावरुन सूचना निर्गमित कराव्यात, तसेच केंद्र सरकारच्या वतीने शिवस्वराज्यसर्किट विकसित झाल्यास मराठयांच्या इतिहासांच्या पाऊलखुणा असलेली सर्व ठिकाणे जागतिक पर्यटनाच्या नकाशावर येण्यास सहाय्यभुत ठरणार असल्याने, शिवस्वराज्य सर्किट विकसित होणे गरजेचे आहे, असेही अमित शहा यांच्यासमोर स्पष्ट केले.
शहांनी दिलं ‘हे’ आश्वासन
खा. उदयनराजे याच्याशी झालेल्या चर्चेनंतर गृहमंत्री अमित शहा यांनी आस्थेवायीकपणे सर्व मुद्दे समजून घेतले आणि यावर लवकरच सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. येत्या काही दिवसात याविषयी हालचाली सुरु होतील तथापि याकामी आमचा पाठपुरावा राहणार असल्याचे शहा यांनी म्हंटले.