सातारा बाजार समितीमध्ये शेतकरी अन् व्यापाऱ्यांच्या बैठकीत आले खरेदीवर तोडगा; प्रतवारी न करता सरसकट खरेदी करण्याचा ठराव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात नवीन आले आणि जुने आले याबाबत दर निश्चिती करताना व्यापाऱ्यांकडून मोठा फरक ठेवला जात असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात सरसकट आले खरेदीचा प्रश्न निर्माण झाला होता. या प्रश्नावर तोडगा काढण्याची मागणी होत असल्याने सातारा बाजार समितीमध्ये शेतकरी आणि व्यापाऱ्यांची नुकतीच एक महत्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रतवारी न करता जुने आणि नवे ‘आले’ सरसकट खरेदी करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

सातारा बाजार समितीने रविवारी व्यापारी आणि शेतकरी यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, उपसभापती मधुकर पवार यांच्यासह संचालक मंडळ, व्यापारी आणि आले उत्पादक शेतकरी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी सांगितल्या. व्यापाऱ्यांकडून नवीन व जुन्या आल्याच्या दरात मोठी तफावत असल्याने आर्थिक नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

तसेच व्यापाऱ्यांनी आले खरेदीनंतर ३० टनापर्यंत गाडी भरण्याची वाट न पाहता १२ टन भरताच इन्सुलेटेड व्हॅनने माल पाठवावा, जेणेकरून तो खराब होणार नाही. याशिवाय शेतमालाचे पेमेंट वेळेत द्यावे, अशीही मागणी शेतकऱ्यांनी केली. बैठकीत खरेदीदार व्यापाऱ्यांनी सरसकट आले सद्यस्थितीतील बाजार भावाने खरेदी करण्याचे मेनी करण्यात आले. शेतकऱ्यांनी कोणतीही प्रतवारी न करता सरसकट एकत्र करून आले शेतमाल बाजार समितीतील अधिकृत परवानाधारक व्यापाऱ्यांनाच विकावा. व्यापाऱ्याने सरसकट आले खरेदीचा सौदा न केल्याची तक्रार बाजार समितीकडे आल्यास व्यापाऱ्याचा परवाना रद्द करण्यात येऊन फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असे ठराव करण्यात आले.