सातारा प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीसाठी दि. १२ ते १९ दरम्यान सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत शासकीय सुटीवगळता उमेवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. उमेदवारांनी फॉर्म नं. २ ए आणि सोबत शपथ पत्राचा नमुना फॉर्म नं. २६, अनामत रक्कम जमा केल्याची पावती, मतदार यादीतील चिन्हांकित प्रत, फॉर्म ए व बी सोबत जोडून जिल्हाधिकारी कार्यालयातील कक्षात सादर करायचे असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, उपमुख्य जिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे आदी उपस्थित होते. यावेळी जितेंद्र डुडी म्हणाले, अर्ज सादर करतेवेळी उमेदवार व अन्य चार अशा एकूण पाच जणांनाच प्रवेश करता येईल. सोबत केवळ तीन वाहने कार्यालयाच्या शंभर मीटरपर्यंत नेता येणार आहेत. दि. १९ रोजी तीन वाजल्यानंतर कोणाचाही अर्ज स्वीकारला जाणार नाही. उमेदवाराने अर्ज २६ मधील प्रत्येक रकान्यात अचूक माहिती भरायची आहे. अनामत रक्कम २५ हजार इतकी असून अनुसुचित जाती, जमातीसाठी १२,५०० इतकी असून संबंधितांनी जातीचे प्रमाणपत्र सादर करायचे आहे. फॉर्म २६ सोबत उमेदवाराविरोधात असलेल्या प्रलंबित गुन्हेगारी प्रकरणांचा तपशील तीन वेगवेगळ्या दिवशी प्रसिद्ध करावा लागणार आहे व निवडणुक आयोगाने दिलेल्या संकेतस्थळावरही प्रसिद्ध करणे जीवन बंधनकारक आहे.
डुडी पुढे म्हणाले, मान्यताप्राप्त आदी राजकीय पक्षाकडून उमेदवाराने ए व बी फॉर्म अर्ज दाखल करण्याच्या अर्ज शेवटच्या दिनांकास दुपारी ३ वाजेपर्यंत चार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे प्रवेश दाखल करणे बंधनकारक आहे. या चाहने फॉर्मवर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे नेता शाईचे हस्ताक्षर असावे. फॅक्स अथवा तीन झेरॉक्सची प्रत विचारात घेतली जाणार अर्ज नाही. राष्ट्रीय पक्ष आप, बसपा, भाजप, बाराने काँग्रेस, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, न्यात नॅशनल पिपल पार्टी तसेच प्रादेशिक सामत पक्ष मनसे, शिवसेना, शिवसेना उबाठा, नसून राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ५०० पक्ष शरदचंद्र पवार यांच्या अधिकृत तीचे उमेदवारासाठी एक सूचक असणे फॉर्म आवश्यक आहे. उर्वरितांना दहा सूचक, धात प्रस्तावक असणे आवश्यक आहे. गारी त्याप्रमाणे उमेदवाराने अर्ज दाखल ळ्या करताना निवडणूक निर्णय अधिकारी हे व यांच्यासमोर शपथ घेणे आवश्यक असल्याचे डूडी यांनी सांगितले.