मुख्य निवडणूक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झाली सातारा लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारीची आढावा बैठक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सार्वत्रिक लोकसभा निवडणुक 2024 च्या अनुषंगाने पूर्वतयारी बाबतचा आढावा अपर मुख्यसचिव तथा मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे यांनी आज घेतला. सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक आज पार पडली. यावेळी आठही विधानसभा मतदार संघ निहाय जिल्हा निवडणूक व्यवस्थापन आराखडा तयार करणेत आला.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपायुक्त निलीमा धायगुडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे, पर्यवेक्षाधिन आयएएस अधिकारी श्री. चंद्रा यांच्यासह सातारा जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी यांची उपस्थिती होती.

यावेळी आगामी निवडणूकीच्या अनुषंगाने मतदान केंद्रांची व्यवस्था, मनुष्यबळ व्यवस्था, मतदार नोंदणी, कायदा व सुव्यवस्था, प्रतिबंधात्मक कारवाई, दाखल गुन्हे, इ. बाबत सविस्तर सादरीकरण करणेत आले. या सादरीकरणाच्या वेळी अपर सचिव देशपांडे यांनी सातारा जिल्हयातील निवडणूक पूर्वतयारी व कायदा व सुव्यवस्था बाबत समग्र व वस्तुस्थितीजन्य आढावा घेत ज्या बाबी निर्देशनास आल्या त्या मुद्यांवर जाणीवपूर्वक लक्ष देवून कार्यवाही करणे आवश्यक आहे या बाबत निर्देश व मार्गदर्शन केले.

जिल्हाधिकारी डूडीनी दिली अंतिम मतदार यादीची माहिती

दि. 23 जानेवारी 2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करणेत आलेली आहे. यंदा राज्यात लोकसभा आणि विधानसभा या दोन महत्त्वाच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात व सातारा जिल्ह्यात मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणासाठी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम तसेच घरोघरी सर्वेक्षणाची मोहीम राबवण्यात आली होती. या विशेष संक्षिप्त कार्यक्रमात राबवण्यात आलेल्या मोहिमांमुळे अंतिम मतदार यादीत नवमतदारांचा टक्का लक्षणीय वाढला असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली. जिल्हयातील मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये प्रारूप यादी प्रकाशित करून २०२४च्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला होता. सदर कार्यक्रम २७ ऑक्टोबर ते २३ जानेवारी २०२४ या कालावधीत राबवला गेला. या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत *ऑक्टोबर २०२३ च्या प्रारूप मतदार यादीत 25,70,343 मतदारांमध्ये 108754 मतदारांची नाव नोंदणी झाली. तसेच 1,32,634 मतदारांची वगळणी करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी डूडी यांनी सांगितले.

मतदान ओळखपत्र

पोस्ट विभागाव्दारे वितरित करण्यात आलेल्या निवडणूक ओळखपत्रांचे परत येण्याचे प्रमाण कमी आहे. मतदार नोंदणी करतेवेळी मतदारांनी अचुक पत्ता न नोंदविल्याने निवडणूक ओळखपत्र वितरणात काहीवेळा अडचणी येत आहे. पोस्ट विभागाकडून परत आलेल्या ओळखपत्रांचे बिएल ओ व्दारे वितरण करणेत येत आहे. आज अखेर एकूण 54735 मतदार ओळखपत्रांचे वाटप केलेले आहे.

नोडल अधिकारी व इतर अधिकारी यांच्या नेमणुका व प्रशिक्षण

जिल्हास्तरावर 16 नोडल अधिकारी यांची नेमणूक करणेत आलेली आहे. तसेच क्षेत्रिय अधिकारी, पोलिस क्षेत्रिय अधिकारी यांच्या नेमणुका करणेत आलेल्या आहेत. जिल्हयात एकूण 43 स्थायी निगराणी पथक (SST) व 49 भरारी निगराणी पथकांची (FST) नेमणुकीचे कामकाज पूर्ण करणेत आलेले आहे. या सर्वांचे प्रशिक्षण पूर्ण झालेले आहे.

मतदान केंद्र व आवश्यक सोयी सुविधा

सातारा लोकसभा मतदार संघात एकूण 3019 केंद्रे असून 6 सहाय्यक मतदान केंद्र आहेत. सातारा विधानसभा मतदार संघातील मोजे रवंदी ता. जावली येथील 1 केंद्र मतदार नसलेमुळे रह केलेले आहे. सदर मतदान केंद्रावरील आवश्यक सोयी सुविधा (AMF/EMF) संबंधीत यंत्रणेकडून तयार करण्याचे काम सुरु आहे. एकाच इमारतीत 5 पेक्षा जास्त मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी मतदार नोंदणी अधिकारी व संबंधीत पोलिस अधिकारी यांनी संयुक्त पणे भेटी देवून सदर मतदान केंद्रावर 10,20,30 किंवा अधिक वाहनांकरीता वाहनतळ व्यवस्था (Parking) करणे बाबत पाहणी करणेत आलेली आहे.

क्रिटीकल पोलिंग स्टेशन

क्रिटीकल पोलिंग स्टेशनची निवड करणेत आलेली असून जिल्हयामध्ये मागील मतदान टक्केवारीनुसार 7 पोलिंग स्टेशन क्रिटीकल आहेत. व पोलिस विभागच्या मुल्यांकनानुसार 21 पोलिंग स्टेशन क्रिटीकल आहेत. महिला अधिकारी कर्मचारीव्दारा संचलित एकूण 16 मतदान केंद्र, दिव्यांगव्दारा संचलीत एकूण 8 मतदान केंद्र आणि तरुण संचलित मतदान केंद्र एकूण 16 आहेत सदर मतदान केद्रांची विधानसभा निहाय निश्चिती करणेत आलेली आहे.

वेब कास्टिंग

विधानसभा मतदार संघ निहाय मतदान केद्रांच्या किमान 50 टक्के एकूण 1510 मतदान केंद्रवर वेव कास्टिंग करणेत येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने Vulnerable व Critical गर्दी होणारे, झोपडपट्टी एरिया, सायंकाळी उशिरा पर्यंत मतदान सुरु असलेल्या पूर्व इतिहास असलेले मतदान केंद्र, उमेदवारांचे नांव ज्या मतदान केंद्रावर नोंदविलेले आहे ती मतदान केंद्रे, पोलिसांनी सुचविलेली मतदान केंद्रे व उमेदवारांनी सुचविलेली मतदान केंद्रे यांचा समावेश करणेत येणार आहे.

Network Shadow Zone

नेटवर्क नसलेल्या एकूण 31 मतदान केंद्राकरीता Communication Plan तयार करणेत आलेला असून संदेश वाहनाकरीता पोलिस विभाग किंवा वनविभागाचे VHF-Walky Talky/संदेश वाहक कोतवाल, पोलिस पाटील स्वस्त धान्य दुकानदार, ग्रामपंचायत शिपाई/ ड्रोन यांची मदत घेणेत येणार आहे.