Satara Lok Sabha 2024 Result : साताऱ्यात मतमोजणीस सुरुवात; उदयनराजे आघाडीवर शशिकांत शिंदे पिछाडीवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा निवडणूक २०२४ च्या मतमोजणीला (Satara Lok Sabha 2024 Result) पोस्टल मत मोजणीने ठीक आठ वाजता सुरुवात झाली असून महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले विरुद्ध म्हाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यात अतीटतीची पहायला मिळत आहे. दरम्यान, पहिल्या फेरीत उदयनराजे भोसले आघाडीवर असल्याचे दिसत आहेत.

साताऱ्यात भाजपकडून खासदार उदयनराजे भोसले तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत आहे. विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे निवड़णूक न लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर या ठिकाणी शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली.

उदयनराजे यांच्यासाठी साताऱ्यात कराडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. उदयनराजेंना अखेरच्या क्षणी उमेदवारी जाहीर झाली होती. सातारा लोकसभा मतदारसंघात एकूण मतदानाच्या ६३.१६ टक्के इतकं मतदान झालं आहे. साताऱ्यात एकूण मतदान १८ लाख ८९ हजार ७४० इतकं असून ११ लाख ९३ हजार ४९२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय. साताऱ्यात २३ फेरीत मतजमोजणी होणार आहे. सायंकळी सहा ते सात वाजेपर्यंत निकाल जाहीर होईल यासाठी प्रशासनाकडून तयारी करण्यात येत आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी मतदान झाले.