सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हयातील बस स्थानक परिसरामध्ये गर्दीचा फायदा घेवून प्रवाश्यांचे सोन्याचे दागिणे, साहित्य याची चोरी करणाऱ्या टोळींवर सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली आहे. या टोळीतील तीन सदस्यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून सुमारे 32 लाख 6 हजार 700 रुपये किमतीचे 50.1 तोळे सोन्याचे दागिणे हस्तगत केले आहेत.
रुपाली अर्जुन सकट (रा. जयसिंगपूर), गीता संदीप भोसले (रा. जयसिंगपूर), सोनार रफिक अजिज शेख (रा. सांगली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि. १४/११/२०२३ रोजी सायंकाळी ५.३० वा.चे. सुमारास बस स्थानक सातारा येथे फिर्यादी बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बॅगची चेन तोडून बॅगेतील ३ लाख १० हजार रुपये किमतीचे ७.२५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे असणारा डबा चोरुन नेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाणे गु.र.नं.९६६/२०२३ भादविक ३७९ अन्वये नोंद करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक श्री.समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल यांनी सातारा जिल्हयातील बस स्थानक परिसरात चोऱ्या करणाऱ्या आरोपींची माहिती काढून त्यांचवर प्रभावशाली कारवाई करण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना दिल्या होत्या. पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांचे अधिपत्याखाली एक पथक तयार करुन त्यांना नमुद इसमांची माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांनी नमुद गुन्हा स्वतःकडे तपासास घेवून विश्वसनीय बातमीदार तसेच तांत्रिक विश्लेषनाद्वारे अज्ञात आरोपींची माहिती प्राप्त करण्याचा प्रयत्न केला.
दि.०६/०१/२०२३ रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना माहिती प्राप्त झाली की, Pickpocketing करणारी टोळी सातारा जिल्हयात कार्यरत असून सदरची टोळी जिल्हयातील बस स्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेवून प्रवाश्यांचे सोन्याचे दागिणे व साहित्य चोरी करीत आहे. सदरच्या टोळीतील दोन महिला या सातारा बस स्थानकाचे आवारामध्ये फिरत आहेत, अशी खात्रीशिर माहिती प्राप्त झाल्यानंतर त्यांनी पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे व त्यांचे पथकास नमुद महिलांना ताब्यात घेवून पुढील कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या. नमुद तपास पथकाने सातारा बस स्थानक परिसरामध्ये सापळा लावून दोन्ही महिलांना महिला पोलीस अंमलदार यांचे मदतीने ताब्यात घेतले.
पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील महिला पोलीस अंमलदार यांचे मदतीने दोन्ही महिलांचेकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी सातारा जिल्हयातील सातारा शहर, वहुज, फलटण शहर, कराड शहर, दहिवडी, कोरेगाव या चसस्थानकावर प्रवाश्यांच्या सोन्याच्या दागिण्यांची चोरी केली असल्याचे सांगीतले आहे. नमुद महिलांनी चोरी केलेले सोन्याचे दागिणे हे सांगली येथील सोनारांना विक्री केले असल्याचे सांगीतले. त्याप्रमाणे तपास पथकाने तात्काळ सांगली येथील एका सोनारास ताच्यात घेवून नमुद गुन्हयात अटक करुन त्यांचेकडून महिला आरोपींनी चोरी केलेले चालू बाजार भावाप्रमाणे ३२ लाख ६ हजार ७०० रुपये किमतीचे एकूण ५०.०१ तोळे सोन्याचे दागिणे हस्तगत करुन बस स्थानक परिसरात Pickpocketing करणारी टोळी ताब्यात घेवून रेकॉर्ड ब्रेक कारवाई केलेली आहे.
पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रविंद्र भोरे, रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, तानाजी माने, पोलीस अंमलदार सुधीर बनकर, विश्वनाथ संकपाळ, अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, मंगेश महाडीक, साचीर मुल्ला, सचिन साळुंखे, अमोल माने, मोहन नाचण, अजित कर्णे, हसन तडवी, मुनीर मुल्ला, सनी आवटे, राकेश खांडके, शिवाजी भिसे, मनोज जाधव, राजू कांबळे, प्रविण कांचळे, स्वप्नील दौंड, केतन शिंदे, धीरज महाडीक, मोहसनि मोमीन, महिला पोलीस अंमलदार दिपाली यादव, सौजन्या मोरे, शकुंतला सणस, आधिका वीर, तृप्ती मोहिते, अनुराधा सणस, काजल साबळे, मोनाली पवार, सुवर्णा पवार, आरती भागडे, दिपाली गुरव, पंकजा जाधव, पंकज बेसके, अमृत कर्षे, संभाजी साळुंखे, दलजित जगदाळे, विजय निकम, सायबर विभागचे अमित झेंडे यांनी सदरची कारवाई केली.
2 कोटी 70 लाख 80 हजार 700 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत
माहे नोव्हेंबर २०२२ पासून दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, मोटार सायकलचोरी, इतर चोरी असे एकूण १६३ मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणले आहे. नमुद गुन्हयातील चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिण्यांपैकी ४४२ तोळे सोने (४ किलो ४२० ग्रॅम) असा एकूण २ कोटी ७० लाख ८० हजार ७०० सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.