रात्रीच्यावेळी लॉजवर वेश्या पुरवण्याचा करायचे व्यवसाय; पोलिसांनी दोघांच्या आवळल्या मुसक्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरालगत राष्ट्रीय महामार्गावरील मलाबार लॉजिंग अॅन्ड बोर्डींग येथे कुंटणखाना चालविणाऱ्या दोन इसमांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ताब्यात घेतले आहे. गौतम परशुराम काकडे (वय 28, रा. गौतमनगर शिवाजीनगर, लातूर) व जय अमर कांबळे (वय 20, रा. प्रतापसिहनगर, सातारा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्याकडून सातारा जिल्ह्यात बेकायदेशीर चालणाऱ्या कुंटणखान्याची माहिती प्राप्त करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मदन फाळके यांना सातारा जिल्हयात बेकायदेशीर चालणाऱ्या कुंटणखान्याची माहिती प्राप्त करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. दि. 24 जुलै रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना माहिती प्राप्त झाली की, दोन इसमांनी राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 वरील पूजा पेट्रोल पंप शेजारी असणारे मलाबार लॉजवर वेश्यागमना करीता मुली ठेवल्या आहेत.

त्या ठिकाणी पुरुष ग्राहकांना मुली पुरवितात. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक अरुण देवकर व पथकाने प्राप्त माहितीचे ठिकाणी जाऊन छापा टाकला. तसेच त्याठिकाणाहून गौतम परशुराम काकडे व जय अमर कांबळे यांना ताब्यात घेतले. त्यांना पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्यांच्या विरुध्द सातारा तालुका पोलीस ठाण्यात ३२५/२०२३ भा.द.वि.कलम ३७० (१) (२)(३), ३४ सह मानवी अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ४,५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस उपनिरीक्षक मदन फाळके, पोलीस अंमलदार दिपक मोरे, अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, प्रविण फडतरे, ओंकार यादव, पंकज बेसके, पंकजा जाधव, मोनाली निकम, माधवी साळूंखे, क्रांती निकम, आदिका वीर, अनुराधा सणस यांनी कारवाई केली आहे. कारवाई मधील सर्व अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी अभिनंदन केले आहे.