सातारा प्रतिनिधी । स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून नुकतीच देशी बनावटीचे पिस्टल, काडतुसे बाळगणाऱ्या विरुद्ध कारवाईची मोहीम राबविली जात आहे. दरम्यान, 1 देशी बनावटीचे पिस्टल व 3 रिकामी काडतुसे बाळगल्या प्रकारणी कराड तालुक्यातील एकास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून सुमारे सुमारे 1 लाख 15 रुपये किमतीचे पिस्टल व काडतुसे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.
संजय विष्णू बनसोडे (वय 47, रा. वाघेरी, ता. कराड, जि. सातारा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी बेकायदा बिगर परवाना स्वत:चे जवळ पिस्टल बाळगणारे इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करण्याच्या पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना सूचना दिलेल्या होत्या. त्या अनुशंगाने त्यांनी पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे व पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील यांचे मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करुन त्यांना अवैध शस्त्रांबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले.
त्यानंतर मंगळवार, दि. १५ रोजी पोलीस उपनिरीक्षक अरुण देवकर यांना माहिती प्राप्त झाली की, वाघेरी, ता. कराड जि. सातारा येथील एका इसमाचे जवळ भारतीय बनावटीचे पिस्टल आहे. त्याप्रमाणे त्यांनी सदरची माहिती पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे व पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील यांचे पथकास देवून त्यांना नमुद इसमास ताब्यात घेण्यास सांगितले. नमुद तपास पथकाने वाघेरी ता. कराड गावी जावून नमुद इसमाची माहिती काढून त्यास ताब्यात घेवून त्याची अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडतीमध्ये १ लाख १५ हजार रुपये किमतीचे १ भारतीय बनावटीचे पिस्टल व ३ रिकामी काडतुसे मिळून आली आली. यावरून त्याचे विरुध्द कराड तालूका पोलीस ठाणे गु.र.नं. ५१७/२०२३ भारतीय हत्यार अधिनियम ३, २५ अन्वये नोंद केला आहे. नोव्हेंबर २०२२ पासून एकूण ३८ देशी बनावटीची अग्निशस्त्रे व ५३ काडतुसे जप्त करण्यात आलेली आहे.
1 लाख किंमतीचे देशी बनावटीचे पिस्टल अन् 3 रिकामी काडतूसे जप्त; कराड तालुक्यातील एकास अटक pic.twitter.com/KnkmttNpyP
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) August 16, 2023
पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पतंग पाटील, पोलीस अंमलदार सुधीर बनकर, अतिश घाडगे, विजय कांबळे, संजय शिर्के, साबीर मुल्ला, सचिन साळूंखे, अमोल माने, अजित कर्णे, सनी आवटे, अर्जुन शिरतोडे, मनोज जाधव, शिवाजी भिसे, स्वप्नील दौंड, केतन शिंदे, मयुर देशमुख, मोहसिन मोमीन, धीरज महाडीक, वैभव सावंत, संदिप कांबळे यांनी ही कारवाई केली आहे. कारवाई मधील सर्व अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी अभिनंदन केले आहे.