सातारा प्रतिनिधी । सातारा येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सध्या शहरात घरफोडी, चोरी तसेच लुटमारीच्या घटनांमधील फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे. आज शहरातील दोन घरफोडीच्या घटनांमधील फरार आरोपीला दागिने विक्रीसाठी घेऊन जाताना सापळा रचून रंगेहात पकडण्यात आले. निलेश शरद तावरे (रा. घुले कॉलनी शाहुनगर सातारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी घरफोडी चोरीचे गुन्हे उघड करणेबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना सुचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक अरुण देवकर याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक अमित पाटील व पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करण्यात आले होते. दरम्यान, दि. २७ जुलै रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना माहिती मिळाली की, एका काळ्या रंगाच्या दुचाकी (क्रमांक MH 19/BM 1828) वरुन आरोपी निलेश शरद तावरे (रा. घुले कॉलनी शाहुनगर सातारा) हा साईबाबा मंदीर गोडोली जवळ चोरीचे दागिने विक्रीसाठी येणार आहे.
त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील तपास पथकास संबंधित ठिकाणी जाऊन कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. तपास पथकाने साईबाबा मंदीर गोडोली येथे सापळा लावून संबंधित निलेश तावरे यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून मणीमंगळसुत्र, अंगठी तसेच २ मोबाईल मिळुन आले. त्याबाबत त्याचेकडे विचारपुस केली असता त्याने चोरी केली असल्याची कबुली दिली. यावरून आरोपीवर सातारा शहर पो.स्टे. गुरनं ४९७/२०२३ भादविंसक ३८० प्रमाणे व शाहुपुरी पोलीस स्टेशन गुरनं ५७ / २०२३ भादविंसक ३८०, प्रमाणे गुन्हे दाखल केला आहे. तसेच त्याच्याकडून २ घरफोडी चोरीचे गुन्हे उघड करण्यात आले असून सातारा शहर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले आहे.
घरफोडीतील दागिने विकायला गेला अन् फसला; 36 हजाराच्या दागिण्यांसह पोलिसांनी केली अटक pic.twitter.com/enu9dF7zpq
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) July 28, 2023
सदर कारवाईत पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे पोलीस उप-निरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, मधुकर गुरव पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, संतोष सपकाळ, शरद बेबले, लैलेश फडतरे, मंगेश महाडीक, प्रविण फडतरे, हसन तडवी, अविनाश चव्हाण, गणेश कापरे, अमित माने, स्वप्निल कुंभार, ओंकार यादव, मोहन पवार, मनोज जाधव, विक्रम पिसाळ, विशाल पवार, सचिन ससाणे, पृथ्वीराज जाधव, रोहित निकम, संकेत निकम यांनी सहभाग घेतला आहे. सहभागी सर्व अधिकारी व अंमलदार यांचे दापोलीस अधीक्षक समीर शेख व बापु बांगर यांनी अभिनंदन केले आहे.