सातारा एलसीबीने 12 तासात घरफोडीच्या गुन्ह्याचा केला पर्दाफाश, तिघांना ठोकल्या बेड्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा स्थानिक गुन्हे शाखेने १२ तासात घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत १ लाख ५० हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच दुसऱ्या घटनेत हद्दपारीचा भंग करून वावरत असलेल्या संशयिताला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला.

सातारा शहरातील करंजेपेठ येथील समर्थ भांडी दुकानाचा पत्रा उचकटून १ लाख ५० हजार रुपये किंमतीच्या तांब्याच्या तारा अज्ञात चोरट्यांनी २३ मार्च रोजी चोरून नेल्या होत्या. याबाबतची फिर्याद शाहुपूरी पोलीस ठाण्यात नोंद झाली होती. हा गुन्हा उघडकीस आणण्याचा आदेश पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना दिला होता. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे यांच्या अधिपत्याखाली तपास पथक तयार करण्यात आले होते.

सदरची घरफोडी ही पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार अभिषेक उर्फ सोमनाथ गणेश आवारे (रा. कोंडवे, ता. जि.सातारा), ओंकार संदीप थोरात (रा. मोळाचा ओढा, सातारा) आणि रोहन विलास थोरात (रा. मतकर कॉलनी, सातारा) यांनी केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना बातमीदारामार्फत मिळाली. त्यानुषंगाने पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी संशयितांना ताब्यात घेवून कारवाई करण्याचे आदेश दिले. तपास पथकाने संशयितांना मोळाचा ओढा येथून ताब्यात घेवून अटक केली. संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांनी चोरलेला मुद्देमालही पोलिसांनी हस्तगत केला.

सातारा जिल्ह्यातून २ वर्षाकरीता हद्दपार केलेला सॅमसन उर्फ बॉबी एन्थनी ब्रुक्स (रा. केसरकरपेठ, सातारा) हा क्षेत्र माहुली, सातारा येथे आढळून आल्याने त्यास ताब्यात घेवून त्याच्याविरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुधीर पाटील, रोहित फार्णे, उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, तानाजी माने, अंमलदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेचले, लक्ष्मण जगधने, शैलेश फडतरे, प्रविण फडतरे, अमित माने, अरुण पाटील, स्वप्नील कुंभार, अविनाश चव्हाण, अजय जाधव, अमित झेंडे, गणेश कापरे, ओंकार यादव, मोहन पवार, पृथ्वीराज जाधव, विशाल पवार, रोहित निकम, वैभव सावंत, सचिन ससाणे, मयुर देशमुख, शिवाजी गुरव यांनी ही कारवाई केली.