सातारा जिल्ह्यास तिसऱ्या RTO कार्यालयामुळे मिळणार नवी ओळख

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | जनतेची प्रशासकीय कामे जलद व्हावीत, वेळ आणि पैशाची बचत व्हावी, यासाठी लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यातून तालुका पातळीवर प्रशासकीय नवनवीन सोयी-सुविधा उपलब्ध होत आहेत. सध्या जिल्ह्यात सातारा आणि कराडला अशी दोन स्वतंत्र आरटीओ कार्यालये आहेत. त्यात आणखी एका आरटीओ कार्यालयाची भर पडणार आहे. श्रीरामनगरी अर्थात फलटणला नवीन आरटीओ कार्यालय मंजूर झाले असून सध्या प्रशासकीय बाबींची पूर्तता सुरू आहे.

खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकरांचा पाठपुरावा

माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी फलटण येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व्हावे, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. मुख्यमंत्र्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला असून शासनाचे अधिकृत अंतिम मंजुरीचे पत्र सातारा प्रादेशिक परिवहन कार्यालयास प्राप्त झाले आहे. त्यामुळे लवकरच सातारा जिल्ह्यात तिसरे आरटीओ कार्यालय सुरू होणार आहे.

सत्र न्यायालयाचे कामकाज सुरू

फलटणमध्ये नुकतेच सत्र न्यायालय सुरू झाले आहे. त्यामुळे पक्षकारांना आता न्यायालयीन कामासाठी सातारला हेलपाटे मारावे लागणार नाहीत. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू होत असल्याने वाहनधारकांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे. या दोन प्रशासकीय सुविधांनंतर लवकरच अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय देखील सुरू होणार आहे. यामुळे फलटण तालुक्याचे अनेक वर्ष रखडलेले मूलभूत प्रश्न मार्गी लागत आहेत.