जिल्ह्याला मिळणार 1 उपमुख्यमंत्री अन् 2 मंत्रीपदे?; सातारकरांचे शपथविधीकडे लागले लक्ष

0
5
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | आज सायंकाळी महायुती सरकारमधील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा शपथ विधी पार पडणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस मुंबई येथील आझाद मैदानावर शपथ घेणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यांच्यासोबत अजित पवारही शपथ घेणार असून, एकनाथ शिंदे यांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उपमुख्यमंत्रीपदासाठी आमदार शंभूराज देसाई यांचे देखील नाव समोर आले असून दरम्यान, त्याला यश मिळाल्यास राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा एकाच जिल्ह्यातील दोन नेते एकाचवेळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना दिसणार आहेत. त्यामुळे जिल्ह्याला दोन उपमुख्यमंत्री मिळणार का, याची सातारकरांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

गुरुवारी मुंबई येथील आझाद मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शपथविधीचा सोहळा होणार आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे दोघे शपथ घेणार असल्याचे स्पष्ट आहे. एकनाथ शिंदे यांनीही मंत्रिमंडळात सामील होत शपथ घ्यावी, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यावर अद्याप शिंदेंचा स्पष्ट होकार आलेला नाही. शिंदे यांनी सोबत शपथ घेत मंत्रिमंडळात सामील व्हावे, अशी फडणवीस यांची इच्छा आहे. त्यासाठी शिंदे यांचे मन वळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

शपथविधी सोहळा किती वाजता?

महाराष्ट्रातील नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळ्याला आज संध्याकाळी ५ वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. यानंतर संध्याकाळी ५.३० वाजता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतील. यावेळी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी सोहळा होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या वेळेमुळे कार्यक्रमाचं स्वरूप संक्षिप्त करण्यात आलं आहे. तर इतर मंत्र्यांचा शपथविधीदेखील लवकरच पार पडेल. मुंबईतील राजभवनात मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. नागपुरातील हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्यातील मंत्रिमंडळ अस्तित्वात येणार आहे.