सातारा जिल्ह्यात 3 लाख 4 हजार 523 जॉबकार्डधारकांची नोंद; उच्चशिक्षित युवकही हजेरीवर कामाला

0
175
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सध्या अनेक युवक बेरोजगारीपासून सुटका मिळावी म्हणून छोटी मोठी नोकरी पत्करत आहेत. शिक्षण घेतल्यानंतर चांगली नोकरी लागावी, अशी युवकांची खूप इच्छा असते. मात्र, उच्च शिक्षण घेऊन देखील कमी पगारात निकरी करावी लागत असल्याने युवकांची निराशा होत आहे. नोकरभरती होत नसल्याने सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. काही बेरोजगार तरुण तर चक्क रोजगार हमी योजनेच्या कामावर राबत असल्याचे सातारा जिल्ह्यात दिसून येत आहे.

राज्य शासनाने मागेल त्याला काम देण्यासाठी रोजगार हमी योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभमिळविण्यासाठी प्रथम नोंदणी करून जॉबकार्ड मिळवावे लागते. ग्रामीण भागात रोजगाराचा मोठा प्रश्न आहे. उन्हाळ्यात तर शेतीत कामे नसल्याने मजुरांची कामाच्या शोधात भटकंती होते. त्यामुळेच ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून विविध कामे केली जात आहेत. यात मजुरांसोबतच सुशिक्षित बेरोजगार तरुणही काम करण्यास जात आहेत.

याचे प्रमाण कमी असले तरी प्रत्येक तालुक्यातच रोजगार हमी योजनेच्या कामावर बारावी, पदवीधर झालेले तरुण राबताना दिसत आहेत. जॉबकार्डवर केवळ नाव, गाव एवढीच माहिती असते. नोंदणी दरम्यान केवळ जातीचा प्रवर्ग नमूद केला जातो. त्यामुळे प्रत्यक्षातसुशिक्षित बेरोजगार किती, याची आकडेवारी समोर आलेली नाही. जिल्ह्यात ३ लाख ४ हजार ५२३ जॉबकार्डधारकांची नोंद आहे.

कोणत्या तालुक्यात किती जणांकडे जॉबकार्ड?

जावळी : १५६४७
कराड : ४२४४५
खटाव : ४५४२७
कोरेगाव : २८७१५
महाबळेश्वर : ६६१०
माण : ३०४५९
पाटण : ३९२३४
फलटण : ३५८५२
सातारा : ३४२२४
वाई : १२७७९