सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात मार्च महिन्यापासूनच भीषण पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या असल्याने या टंचाईच्या परिस्थितीत जिल्हा प्रशासनाकडून पुढील तीन महिने उपाययोजना आखण्याची कार्यवाही केली जात आहे. जिल्ह्यात आगामी ३ महिने जाणवणारी संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने टंचाई आराखडा तयार केला आहे.
यामध्ये १० तालुक्यांतील ४७३ गावे ६५७ वाड्यांमध्ये उद्भवणाऱ्या पाणीटंचाईबाबत उपाययोजना आखण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये टँकर सुरू करणे, विहीर अधिग्रहणसह इतर कामांसाठी तब्बल १४ कोटी ६१ लाख ९० हजारांचा आराखडा तयार केला आहे. यामध्ये सर्वाधिक माण तालुक्याला ८.६०, कोरेगाव २.०७, पाटण तालुक्याला १.२० कोटी, तर फलटणला ८६ लाख ५७ हजार रुपयांच्या निधीचा समावेश आहे.
सध्या केवळ माण तालुक्यात ३२ टँकरने ३१ गावे आणि २१८ वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. तालुक्यातील ४६ हजार ८८७लोकसंख्या बाधित आहे. आठ विहिरी व सहा बोअरवेल प्रशासनाने अधिग्रहीत केलेल्या आहेत. आगामी काळात एप्रिल ते जून या कालावधीत संभाव्य पाणीटंचाई जाणवणाऱ्या आणि टँकरची मागणी केलेल्या गावांसाठी जिल्हा प्रशासनाने टंचाई आराखडा तयार केला आहे.
यामध्ये दहा तालुक्यातील ४७३ गावे, ६५७वाड्यांचा समावेश आहे. त्यासाठी ४०० टँकरने पाणीपुरवठा केला जाणार आहेत. २०० खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी तालुकानिहाय संभाव्य टंचाई निवारणासाठी १४ कोटी ६१ लाख ९० हजार रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे. यामध्ये माण, कोरेगाव, फलटण व पाटण तालुक्यांना सर्वाधिक निधी मंजूर आहे.
टंचाई निवारणार्थ तालुकानिहाय निधी मंजुरी…
माण : ८.६० कोटी,
खटाव : ३४.२० लाख,
कोरेगाव : २.०७ कोटी, खंडाळा : ७.०२ लाख, फलटण : ८६.५७ लाख, वाई : ६५.१५ लाख, पाटण : १.२० कोटी, जावळी : ३६.३३ लाख, महाबळेश्वर : २९.४४ लाख,
कराड : १४.५८ लाख.
माण तालुक्यातील या गावात टँकर सुरू…
दहिवडी सर्कल : बिजवडी, पांगरी, येळेवाडी, पाचवड, राजवडी, जाधववाडी.
शिंगणापूर सर्कल : मोही, डंगिरेवाडी, थदाळे, वावरहिरे, अनभुलेवाडी. म्हसवड सर्कल धुळदेव, वरकुटे म्हसवड, कारखेल, हवालदारवाडी, भाटकी, संभुखेड,यू खडकी, रांजणी. गोंदवले बुद्रुक सर्कल जाशी, पळशी.
मार्डी सर्कल : मार्डी, खुटबाव, पर्यंती, इंजबाव.
मलवडी सर्कल : वारुगड, कुळकजाई. आंधळी सर्कल टाकेवाडी, उकिडें, कोळेवाडी.
कुकुडवाड सर्कल : दोरगेवाडी.
संभाव्य टंचाई भासणारी गावे…
माण : ८९ गावे, ५३२ वाड्या
खटाव : ३२ गावे, ३३ वाड्या
कोरेगाव : १३९ गावे, १३ वाड्या
खंडाळा : ६ गावे, १ वाडी
फलटण : ५८ गावे
वाई : २२ गावे, २० वाड्या
पाटण : ५८ गावे, ३३ वाड्या
जावळी : ३३ गावे, १४ वाड्या
महाबळेश्वर : १३ गावे, ७ वाड्या
कराड : २३ गावे, ४ वाड्या