पाटण प्रतिनिधी | जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस वाढत असून हवामान विभागाने आज दि. ९ जुलै रोजीपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार (रेड अलर्ट) पर्जन्यमान होण्याची शक्यता वर्तविलेली आहे. दरम्यान, कोयना पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असून मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार कोयना धरणात 31.67 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. तर 30.09 टक्के धरण भरले आहे.
एक जूनपासून आतापर्यंत १ हजार ६७० मिलीमीटर पाऊस झालेला आहे. कोयना येथे आतापर्यंत १ हजार ५३८ मिलीमीटर पाऊस पडला. तर महाबळेशरलाही एकूण १ हजार २९९ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. या पावसामुळे कोयना धरणात सकाळच्या सुमारास 13 हजार 593 क्यूसेक वेगाने पाणी येत आहे.
जिल्ह्यात यावर्षी पाऊस वेळेत सुरू झाला. तसेच गेल्यावर्षीच्या तुलनेत आतापर्यंत चांगले पर्जन्यमान झाले आहे. 1 जूनपासून 9 जुलैपर्यंत कोयनेला एकूण 1554, नवजा येथे 1691 आणि महाबळेश्वरला 1 हजार 326 मिलीमीटर पाऊस झालेला आहे.
Koyna Dam
Date: 09/07/2024
Time: 08:00 AM
Water level : 2079’08” (633.882m)
Dam Storage :
Gross : 31.67 TMC (30.09%)
Live : 26.55 TMC (26.51%)
Inflow : 13,593 Cusecs.
Discharges
KDPH : 00 Cusecs.
Total Discharge in koyna River: 00 Cusecs
Rainfall in mm -(Daily/Cumulative)
Koyna- 16/1554
Navaja- 21/1691
Mahabaleshwar- 27/1326