सातारा प्रतिनिधी । राज्यातील गोरगरीब जनतेला गौरी गणपती उत्सव आनंदाने साजरा करता यावा, यासाठी राज्य शासनाने आनंदाचा शिधा उपलब्ध करून दिला होता. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील असल्यामुळे सातारा जिल्ह्यात शिधा वाटपाची काटेकोरपणे अंलबजावणी करण्यात आली. आतापर्यंत सातारा जिल्ह्याने ९७.४४ टक्के वितरण करुन आनंदाचा शिधा वितरणामध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.
सातारा जिल्ह्यात एक घडलेल्या घटनेमुळे तीन दिवस इंटरनेट सुविधा बंद होती. या कालावधीत सर्व पुरवठा विभाग अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांनी शिधा वाटपाचे काम हाती घेतले. या काळात त्यांनी परिश्रश्रम घेत आनंदाचा शिधा जिल्ह्यातील स्वस्त धान्य वितरण केंद्रात पोहचविला. तसेच त्या माध्यमातून 97.44 टक्के शिधाचे वितरण करण्यात आले. कमी कालावधीत योग्य नियोजन करून वितरण केल्यामुळे सातारा जिल्हा शिधा वाटपात राज्यात प्रथम क्रमांकावर आला. याबद्दल जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यंत्रणेचे अभिनंदन केले आहे.
सातारा जिल्ह्यात 3 लाख 88 हजार 907 पात्र शिधापत्रिकांधारकांपैकी 3 लाख 78 हजार 934 शिधापत्रिकाधारक कुटूंबाना आनंदाचा शिधाचे वितरण करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्या पाठोपाठ भंडारा जिल्ह्याने 97.37% तर गोंदिया जिल्ह्याने 96.53% वितरण करून अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला आहे.