जिल्ह्यातील 3 लाख 94 हजारहून अधिक शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वाटप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा वाटपाचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार अल्पावधीतच सातारा जिल्ह्यात 3 लाख 94 हजार 771 शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधाचे वितरण करण्यात आला आहे. त्यामुळे शिधावाटपात सातारा जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.

श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा वाटपासाठी देण्यात आलेल्या शिधासंचामध्ये १ किलो साखर, १ लिटर खाद्यतेल व प्रत्येकी अर्धा किलो परिमाणात रवा, चनाडाळ, मैदा व पोहा असे ६ प्रकारच्या पदार्थांचा समावेश करण्यात आला होता. त्यानुसार सातारा जिल्ह्याकरीता एकूण 3 लाख 95 हजार 128 शिधाजिन्नस संचाची मागणी नोंदविण्यात आलेली होती.

दरम्यान, दि. 14 फेब्रुवारी 2024 रोजी जिल्ह्यातील सर्व गोदामात १०० टक्के शिधाजिन्नस प्राप्त झाले. उशिरा शिधाजिन्नस प्राप्त होऊनही जिल्ह्याने अल्पावधीतच जिल्ह्यात 3 लाख 94 हजार 771 शिधापत्रिकाधारक यांना ९९.९ टक्के आनंदाचा शिधाचे वितरण करुन राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त करुन उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.

सातारा जिल्ह्याने सलग तिसऱ्यांदा प्रथम क्रमांक मिळवला : वैशाली राजमाने

राज्यात शिधा वाटपच्या राबविण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये सातारा जिल्ह्याने सलग तिसऱ्यांदा प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. शिधावाटपाची ग्रामीण भागात कठोर स्वरूपात अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. यामुळेच ग्रामीण भागातील शिधापत्रिकाधारकांपर्यंत आनंदाचा शिधा पोचवता आला असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.