सातारा प्रतिनिधी | वाढत्या उष्म्याचा धसका निवडणूक आयोगाने घेतला असून खबरदारी म्हणून मतदारांची काळजी घेण्यासाठी सातारा व माढा लोकसभा मतदारसंघांतील मतदान केंद्रांवर आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच पुरेशा औषधाचे किटही केंद्रांवर ठेकण्यात येणार असून, त्याची जबाबदारी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.
सातारा जिह्यात लोकसभा निवडणूक प्रक्रियेत दिवसेंदिवस सातारा व माढा लोकसभा मतदारसंघात राजकीय वाताकरण तापू लागले आहे. दुसरीकडे ऐन उन्हाच्या तडाख्यात निवडणूक प्रक्रिया होत आहे. सातारा व माढा लोकसभा मतदारसंघांसाठी दि. 7 मे रोजी मतदान होत आहे. जिह्यातील सर्व मतदान केंद्रांवर मतदारांसाठी अत्याकश्यक त्या प्राथमिक उपचारांसाठी औषध किट व क्हीलचेअर सुविधा उपलब्ध करण्याबाबत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने पंचायत समित्यांचे सर्व तालुका आरोग्य अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सर्व कैद्यकीय अधिकाऱयांना सूचना दिल्या आहेत.
मतदान केंद्रांकर नियुक्त असलेल्या आरोग्य पथकाला जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत एक औषधाचे किट पुरवले जाणार आहे. या किटमध्ये ओआरएस, ड्रेसिंग साहित्यासह प्राथमिक उपचाराचे साहित्य क औषधे असणार आहेत. उष्म्याचा त्रास जाणवल्यास मतदारांना तातडीच्या उपचारासह प्रथमोपचार सेवा मिळणार आहे.