सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत 323 पदांवर भरती; दहावी पास ते ग्रॅज्युएट उमेदवारांना करता येणार अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात नोकरीच्या अनेक संधी आहेत. अशीच एक सरकारी नोकरीची संधी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (Satara DCC Bank Recruitment 2024) उपलब्ध झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ लेखनिक आणि कनिष्ठ शिपाई या पदांच्या एकूण ३२३ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे. या भरतीसाठी होणाऱ्या परीक्षेबाबतची माहिती नंतर कळविण्यात येईल. पद, पात्रता आणि अर्ज प्रक्रियेविषयी जाणून घेऊया सविस्तर….

संस्था – सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सातारा
भरली जाणारी पदे – 1. कनिष्ठ लिपिक – 263 पदे, 2. कनिष्ठ शिपाई – 60 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑगस्ट 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
कनिष्ठ लिपिक –
१. उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
२. उमेदवार वाणिज्य शाखेतील पदवीधर असल्यास प्राधान्य
३. उमेदवार MS-CIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक
४. उमेदवारास मराठी (Satara DCC Bank Recruitment 2024) आणि इंग्रजी टायपिंग येणे आवश्यक.
५. लघुलेखनाची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
६. बँकिंग क्षेत्रातील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

कनिष्ठ शिपाई –
१. उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
२. उमेदवारास इंग्रजी भाषेचे प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक.
३. उमेदवारास संगणकाचे प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक.
नोकरीचे ठिकाण – सातारा

वय मर्यादा (Satara DCC Bank Recruitment 2024) –
कनिष्ठ लिपिक – २१ ते ३८ वर्षे
कनिष्ठ शिपाई – १८ ते ३८ वर्षे

अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची सूचना –

  1. उमेदवारांना ५९०/- रु. अर्ज शुल्क भरावे लागेल.
  2. उमेदवारांनी अर्ज सादर करताना वेळीच हे अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक आहे.
  3. अर्ज करण्यापूर्वी PDF नॉटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
  4. अर्ज सादर केल्यानंतर (Satara DCC Bank Recruitment 2024) पुढे ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतली जाईल.
  5. या परीक्षेसाठीचे प्रवेश पत्र आणि परीक्षेचे वेळापत्रक हे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड च्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर केले जाईल.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.sataradccb.com/