सातारा प्रतिनिधी । सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपअधीक्षक उज्ज्वल वैद्य यांची सहायक आयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबई येथे बदली झाली आहे. मात्र, त्यांच्या जागी अद्याप कोणाचीही नियुक्ती झाली नाही.
पोलिस उपअधीक्षक उज्ज्वल वैद्य यांनी 8 महिन्यांपूर्वी सातारा लाचलुचपत विभागाचा पदभार स्वीकारला होता. पदभार स्वीकारताच त्यांनी लाचखोरांना पकडण्याचा चांगलाच धडाका लावला होता. औंध येथील सहायक पोलिस निरीक्षक, साताऱ्यातील सह दुय्यम निबंधक आणि कराडमधील नगर अभियंता यांच्यासह 12 जणांना लाच घेताना त्यांनी सापळा लावून पकडले होते.
सातारा जिल्ह्यात धडाकेबाज कामगिरी केलेल्या पोलिस उपअधीक्षक उज्ज्वल वैद्य यांच्या बदलीमुळे अनेक प्रकारच्या चर्चा केल्या जात आहेत. त्यांच्या जागी आता कोणाची वर्णी लागणार? कोणता अधिकारी येणार? हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.