सातारा प्रतिनिधी । सातारा शहराजवळ पिकअपने दुचाकीला दिलेल्या जोरात धडकेत सातारा शहर ठाण्यात कार्यरत असणारे हवालदार संदीप साहेबराव कणसे यांचा म्रुत्यु झाला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात पिकअप चालकावर गुन्हा दाखल करण्यात आहे. पोलीस हवालदार कणसे हे अंगापूर वंदन येथील रहिवाशी होते.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संदीप कणसे (वय ४७, रा. अंगापूर वंदन) हे सातारा शहर पोलिस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत होते. दि. १९ मे रोजी ते दुचाकी (MH 02 CC 3319) वरुन निघाले होते. शहरा जवळील सातारा ते रहिमतपूर मार्गावर रस्ता क्राॅस करत असताना पिकअप (MH 10 AW 3721) भरधाव आली. या पिकअपची दुचाकीला जोरात धडक बसली.
पिकअपची धडक इतकी जोरात होती की, हवालदार संदीप कणसे यांना गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांना साताऱ्यातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी योगेश बापूराव कणसे (रा. अंगापूर वंदन) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार हर्षद महेंद्र कदम (रा. चाफेर, ता. पाटण) याच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक शिरोळे हे तपास करीत आहेत.