कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात एकीकडे पश्चिम भागात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात असताना दुसरीकडे जिल्ह्यातील राजकीय व्सर्तृकात खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे चेअरमन वसंत लोढा यांना लोणंद पोलिसांनी एका खासगी साखर कारखाण्याच्या मशिनरी देखभाली प्रकारणात लाखोंचा गंडा घातल्या प्रकरणी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई काल रात्री उशिरा करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात कपाशी येथील शरयु अँग्रो इंडस्ट्रीज लि. या साखर कारखाना आहे. या कारखान्याची 1 कोटी 14 लाख 90 हजार 358 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अहमदनगरच्या वसंत लोढा यांच्यासह अन्य पाच जणांवर जणांविरोधात फिर्याद दाखल करण्यात आली होती. दरम्यान लोणंद पोलीस ठाण्याच्या पथकाने लोढा यांच्या निवासस्थानी चौकशी करत त्यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी शरयु अँग्रो इंडस्ट्रीज लि. कारखान्याचे संचालक अविनाश शिवाजी भापकर यांनी फिर्याद दाखल केली आहे.
शरयु अँग्रो इंडस्ट्रीज लि. या कंपनीमध्ये इंजिनिअरींगची विविध प्रकारच्या कामांचा करार सन 2021 मध्ये फॅब्रिक्स इंडस्ट्रीज तर्फे वसंत लोढा व अॅक्युरेट इंजिनिअरींग अण्ड इरेक्शन यांचे तर्फे प्रसाद आण्णा यांच्या सोबत करण्यात आला होता. करारावेळी कोटेशनबरोबर वरील दोन्ही आरोपींनी त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय व खाजगी क्षेत्रामध्ये कामाचा अनुभव असल्याबाबतचे शासनाचे शिक्के व सह्या असलेले दाखले जोडलेले दिले होते.
वर्क ऑर्डर दिल्यानंतर त्यांना मोठी रक्कम अदा करण्यात आली. परंतु फॅब्रिक्स इंडस्ट्रीज तर्फे वसंत लोढा व अँक्युरेट इंजिनिअरींग अॅण्ड इरेक्शन यांचे तर्फे प्रसाद आण्णा यांनी कंपनीचे वर्क ऑर्डरप्रमाणे काम केले नाही व कामास टाळाटाळ करु लागले. त्यावेळी आम्ही वसंत लोढा व प्रसाद आण्णा यांनी दिलेली कागदपत्रे तपासली असता ती कागदपत्रे बनावट, खोटे व तयार केलेले असल्याचे लक्षात आले आहे. वरील दोघांनीही महाराष्ट्र शासनाचे व वेगवेगळ्या सरकारी, निमसरकारी, कंपन्यांचे खोटे दाखले व सही शिक्के तयार करुन त्याचा दुरुपयोग व फसवणुक केल्याचे तक्रारीत म्हंटले आहे.
तसेच या फसवणूक प्रकरणात केलेल्या कामांची तपासणी केली असता कंपनीमध्ये बाहेरुन नवीन साहित्य आलेले नसल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये तसेच गेटवरील इनवर्ड आऊटवर्ड वहीतील नोंदीवरुन दिसून येत आहे. कंपनीमधील संतोष पोपटराव होले (सिनिअर इंजिनीअर), महादेव अनंत भंडारे (चिफ इंजिनिअर), संजय अनिरुद्ध मुळे (सिनिअर इंजिनिअर) यांना पैशाचे आमिष देऊन कंपनीमधील मशिनरी व साहित्य, पॅनल बॉक्स, पाईप हे सर्व नवीन टाकले आहे. तसेच नवीन काम केले, असे भासवून वसंत लोढा आणि प्रसाद आण्णा यांनी फसवणूक केल्याची तक्रार आहे.
कंपनीची फसवणूक केलेली रक्कम त्यांना वेळोवेळी मागणी करुनही त्यांनी सदरची रक्कम कंपनीमध्ये जमा केलेली नसल्याने अखेर कंपनीने या सर्वांवर भादवी कलम ३४, ४०८, ४२०, ४६७, ४६८, ४७१ नुसार फसवणूकीचा गुन्हा लोणंद पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. लोणंद, सातारा पोलिसांनी अहमदनगर शहरात येऊन कोतवाली पोलिसांच्या मदतीनेअहमदनगर मधील वसंत लोढा यांना ताब्यात घेतले आहे.