मराठा आंदोलकांना पाठींबा देत सातारा बार असोसिएशने घेतला ‘हा ‘ मोठा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | जालना जिल्ह्यात अंतरवाली सराटी येथे मराठा बांधवांवर झालेला अमानुष लाठीहल्ला, मराठा आरक्षण या विषयावर राज्यभर चाललेल्या मराठा आंदोलनाला सातारा जिल्हा बार असोसिएशनने पाठींबा दिला आहे. तसेच यावेळी झालेल्या बैठकीत मराठा आंदोलकांवरील खटले विनामोबदला चालवण्याचा मोठा निर्णय बार असोसिएशनने घेतला आहे.

जालना येथील घटनेनंतर सातारा वकील संघटनेच्यावतीने नुकतीच तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत हल्याचा निषेध करण्यात आला. दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करावी, जे मराठा आंदोलनकर्ते आहेत. त्यांच्या खटल्यात विनामोबदला वकीलपत्र दाखल करणार असल्याचे निवेदन बार असोसिएशनने निवासी उपजिल्हाधिकारी, मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांना देण्यात आले.

तसेच सातारा बार असोसिएशनने घेतलेल्या निर्णय राज्यभरातील वकिलांनी घ्यावा. आरक्षणाच्या लढ्यात कायदेशीर बाजू मांडून आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी भावना समन्वयकांच्यावतीने व्यक्त करण्यात आली.

यावेळी अध्यक्ष अॅड. विजय देशमुख, उपाध्यक्ष अॅड . जितेंद्र पिसाळ, पदसिध्द उपाध्यक्ष अॅड . महेश नारायण कुलकर्णी जिल्हा सरकारी वकील, सचिव अॅड. सुरेश महादेव रूपनवर, सह. सचिव अॅड . रोहिणी शंतनू राक्षे, खजिनदार अॅड . गणेश जगन्नाथ राऊत, माजी अध्यक्ष अॅड. अंकुश जाधव, बार आसोसिएशनचे सदस्य मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.