चांद्रयानाच्या यशात राजधानीचाही हातभार; साताऱ्याचे अजिंक्य वाघ ISRO मध्ये कार्यरत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । संपूर्ण जगाचे लक्ष्य लागून असलेले भारताचे चांद्रयान-3 यशस्वीरित्या चंद्रावर पोचले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सेफ लँडिंग करणारा भारत पहिलाच देश ठरला असून जागतिक पाळतीवर देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. चांद्रयान-3 च्या यशानंतर संपूर्ण भारतात आनंद साजरा करण्यात येत आहे. फटाके फोडून, शुभेच्छा देऊन, ट्विट करून लोक इस्त्रोवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. ISRO चे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. याच चांद्रयान मोहिमेत साताऱ्याचाही हातभार लागला आहे. होय, साताऱ्याचे अजिंक्य हरिश्चंद्र वाघ हे ISRO मध्ये कार्यरत असून त्यांच्या रूपाने साताऱ्याचा ठसा चंद्रावरही उमटतोय याचा जिल्हावासीयांना सार्थ अभिमान आहे.

खरं तर सातारा हा क्रांतिकारकांचा आणि शूरवीरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. साताऱ्याने देशाला अनेक क्रांतिकारक दिले, सैनिक दिलेत. परंतु याच साताऱ्यात कर्मवीर भाऊराव पाटील यांनी पहिले कॉलेज काढले आणि शिक्षणाचा पाया रचला. असा हा साताऱ्याचा ज्वलंत इतिहास आहे. एकीकडे चांद्रयान ३ च्या रूपाने भारताने चंद्रावर पाऊल टाकले आणि भारताची अंतराळ संस्था असलेल्या ISRO चे नाव जगभरात अभिमानाने घेतलं जाऊ लागलं. याच ISRO मध्ये साताऱ्याचे अजिंक्य हरिश्चंद्र वाघ हे कार्यरत आहेत. अजिंक्य यांच्या रूपाने भारताच्या या यशात साताऱ्याचाही खारीचा वाटा आहे हे स्पष्ट झालं.

बुधवारी संपूर्ण भारतवासीयांना अभिमान वाटेल अशी बाब घडली आहे. अखेर काल चांद्रयान-3 यशस्वीरित्या चंद्रावर लँडिंग झाल आहे. त्यामुळे भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सेफ लँडिंग करणारा पहिलाच देश ठरला आहे. कालपासून या यशाचा संपूर्ण भारतात आनंद साजरी करण्यात येत आहे. फटाके फोडून, शुभेच्छा देऊन, ट्विट करून लोक इस्त्रोवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

कुठे झालं अजिंक्य वाघ यांचे शिक्षण-

अजिंक्य वाघ यांचे प्राथमिक शिक्षण प्रायमरी स्कुल सातारा आणि माध्यमिक शिक्षण सैनिक स्कुल सातारा येथे झालं. त्यानंतर १२ वि पर्यतचे शिक्षण SGM कॉलेज कराड येथे झाले. तेथून त्यांनी बीटेक साठी तिरुअनंतपुरम येथील ISRO च्या IIT कॉलेज मधून शिक्षण पूर्ण केल. शिक्षण पूर्ण झल्यानंतर ते ISRO मध्येच कार्यरत झाले. सध्याच्या चांद्रयान मोहिमेत अजिंक्यचा सहभाग पाहून त्यांच्या आईवडिलांना सुद्धा खूप अभिमान वाटला. तसेच अजिंक्य मुळे पुन्हा एकदा साताऱ्याचे नाव झळकले.

सगाम काॅलेजची स्थापना कशी झाली?

बहुजन वर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची सोय व्हावी या उद्देशाने कराड येथे महाविद्यालय सुरु करण्याचा विचार कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या मनात होता. आण्णांची ही इच्छा कुसूर गावाच्या दानशूर बंडो गोपाळा कदम (मुकादम तात्या) यांनी पुर्ण करण्याचे ठरवले अन कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगेबाबा अन मुकादम तात्या यांच्या प्रयत्नातून कराड येथे सगाम काॅलेजची स्थापना झाली. मुकादम तात्या गाडगेबाबांना आपले गुरु मानत त्यामुळे महाविद्यालयाला त्यानी गुरुचे नाव दिले. कर्मवीरांच्या कार्याला हातभार लावत मुकादम तात्यांनी सन 1945 साली सद्गुरू गाडगे महाराज हायस्कूल कुसुर ची स्थापना केली. सन 1954 मध्ये पांडुरंग देसाई अध्यापक विद्यालयाची स्थापना केली. तसेच न्यू इंग्लिश स्कूल चाफळ, महाराष्ट्र विद्यालय वाठार , विठामाता कन्या शाळा कराड, लॉ कॉलेज सातारा, कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज इस्लामपूर, ठक्कर बाप्पा विद्यालय गांधी टेकडी व न्यू इंग्लिश स्कूल ढेबेवाडी या विद्यालयाचे उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात मदत केली. कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगेबाबा, मुकादम तात्या या महापुरुषांनी बहुजनांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणुन आपले संपुर्ण आयुष्य खर्ची घातले. आज त्यांनी उभारलेल्या महाविद्यालयतील अनेक विद्यार्थी देशसेवा, मानवसेवा करत आहेत. याचाच एक भाग म्हणजे सगाम काॅलेजमधून शिक्षण घेतलेला अजिंक्य वाघ या विद्यार्थाचा चांद्रयान मिशन मध्ये असणारा सहभाग ही सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.