संतोष देशमुखांच्या हत्याप्रकरणाचा कोणत्याही दबावाला बळी न पडता तपास करा; कराडमध्ये सरपंचांनी काढला जनआक्रोश मोर्चा

0
754
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । संतोष गुरव

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकारनंतर आज सोमवारी सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील सर्व आजी माजी सरपंचांच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात फाशी झाली पाहिजे, राजकीय दबावाखाली न पडता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री धनंजय मुंडेचा राजीनामा घ्यावा या आदी मागण्या सरपंचांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केल्या.

कराड प्रशासकायय कार्यालयासमोर आज दुपारी कराड तालुका संघर्ष समितीतसह विविध संघटानांतर्फे मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात तालुक्यातील अनेक गावचे सरपंच, विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सुरुवातीला कराड येथील दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.

या ठिकाणाहून मोर्चास सुरुवात करण्यात आली. तहसीलदार कार्यालयाच्या आवारात मोर्चाद्वारे दाखल झालेल्या सरपंचांनी ठिय्या मांडला. त्यावेळी विविध गावच्या सरपंचांनी त्यांची भूमिका मांडली तसेच नायब तहसीलदार राठोड यांच्याकडे मागण्याचे निवेदन दिले. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर समाजमन सुन्न झाले. या हत्येप्रकरणात आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. आरोपीना अटक करण्यात आल्यानंतर देखील त्यांच्याविरुद्ध कठोरात कठोर शिक्षेची तरतूद करावी यासह अनेक मागण्या राज्यभरातील गावच्या सरपंचांकडून केलया जात आहेत.