लोकसेवा हेच लोकप्रतिनिधीचे कर्तव्य – सारंग पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | विचारांशी बांधिल आणि तत्वाशी एकनिष्ठ राहणे, ही खा. श्रीनिवास पाटील यांची शिकवण असून लोकांची सेवा करणे हेच कर्तव्य असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांनी केले.

उंडाळे (ता.कराड) विभागातील तुळसण, सवादे, म्हसोली, येवती, भुरभूशी, येणपे, टाळगाव, लोहारवाडी व उंडाळे याठिकाणी खा.श्रीनिवास पाटील यांनी केलेल्या विकासकामांच्या कार्यपूर्ती संपर्क दौऱ्यात ते बोलत होते. यावेळी सारंग पाटील म्हणाले, लोकप्रतिनिधी हे केवळ पद नसून ती एक जबाबदारी आहे. दोन वर्ष कोरोनाचे संकट, राजकिय अस्थिरता असून देखील खा.श्रीनिवास पाटील हे सातारा लोकसभा मतदारसंघात असंख्य विकासकामे पोहचवण्याठी कटिबद्ध राहिले. महामार्गाची कामे, उड्डाणपूल, अंडरपास ब्रीज, रेल्वे प्रकल्पग्रस्तांना न्याय, मोबाईल टॉवर, नळ पाणीपुरवठा योजना आदी कामांसह गावातंर्गत रस्ते, व्यायामशाळा, स्मशानभूमी, बंधारे, संरक्षण भिंत, साकव पूल, रस्ते यासारखी अनेक कोट्यावधींची विकासकामे पोहचवली आहेत. त्यांच्या आभ्यासू नेतृत्वामुळेचं जनसामान्यांची कामे अगदी हक्काने होत आहेत.

केंद्र व राज्य शासनाकडे त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील विविध विकासकामांना चालना मिळाली. विकासाचे राजकारण न करता प्रामाणिकपणे काम करत समाजकारण केल्याने त्यांची तळागाळात नाळ जुळली आहे. त्यातूनच त्यांचे व जनतेचे बंध घट्ट झाले असल्याचे सारंग पाटील म्हणाले.