कराड प्रतिनिधी । “बूथ कमिटीचे महत्व हे अनन्यसाधारण आहे. याची प्रणाली व प्रक्रिया बूथच्या समन्वयक पदाधिकाऱ्यांनी समजून घेतली पाहिजे. पक्षाचे अध्यक्ष आदरणीय खा.शरदचंद्र पवार यांचे विचार तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असा निर्धार केला असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाळवा तालुक्यातील बूथ अध्यक्षांचे प्रशिक्षण शिबीर कराड तालुक्यातील घारेवाडी येथे आज पार पडले. यावेळी सारंग पाटील म्हणाले की, आज खर्या अर्थाने पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सक्षम बूथ कमिटी असणे गरजेचे आहे.
दरम्यान, घारेवाडी येथे आज पार पडलेल्या बूथ अध्यक्षांचे प्रशिक्षण शिबीरात श्री. प्रतिकदादा पाटील, श्री.बाळासाहेब पाटील-बापू, श्री.विजय पाटील-बापू, श्री.संजय पाटील-बापू, श्री.महेंद्र शेवाळे, श्री.आदर्श पाटील, अन्य मान्यवर व वाळवा तालुक्यातील बूथ कमिटीचे अध्यक्ष उपस्थित होते.