सातारा प्रतिनिधी | महाराष्ट्र शासनाने राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीचे सत्र सुरूच ठेवले असून, सातारा जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून संतोष पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बदलीत, मागील जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची पुणे जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. तोष पाटील, जे मागील काळात पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते, त्यांनी सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे.
या नियुक्तीमुळे सातारा जिल्ह्याच्या प्रशासनात एक नवीन अध्याय सुरू होत आहे. संतोष पाटील यांच्या प्रशासनातील अनुभवामुळे सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील, असा विश्वास आहे.
संतोष पाटील यांनी आपली नवी जबाबदारी स्वीकारल्यानंतर, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मनोहर गव्हाड, प्रांताधिकारी वाई राजेंद्र कचरे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या समारंभात त्यांचे स्वागत करण्यात आले.
संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची नवी गती मिळण्याची अपेक्षा आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील विविध विकास योजना आणि प्रकल्पांना चालना मिळेल, असे आश्वासन दिले जात आहे.