जिल्ह्यात स्मार्ट स्कूल आणि आरोग्य केंद्र उपक्रम चालू रहाणार – जिल्हाधिकारी संतोष पाटील

0
50

सातारा प्रतिनिधी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० दिवसांचा कार्यक्रम दिला आहे. यामध्ये सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. जिल्ह्यात स्मार्ट स्कूल आणि स्मार्ट आरोग्य केंद्र हे उपक्रम चालू रहातील. याचे अनुकरण राज्यातील इतरही जिल्हे करतील, असा विश्वास जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी व्यक्त केला.

जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या सूचना अत्यल्प वेळेत लोकांपर्यंत पोचणे अपेक्षित आहे. अधिकार्‍यांनीही आठवड्यातून २ दिवस क्षेत्रभेट द्यावी. शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्रांनाही भेट देणे आवश्यक आहे.

शिक्षण आणि आरोग्य हे दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत. सातारा जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्र मोठे आहे. याचाही लाभ करून घेण्यात येणार आहे. धुमाळवाडी हे ‘फळांचे गाव’, तर भिलार हे ‘पुस्तकांचे गाव’ अशी गावे ओळख निर्माण करत आहेत. या गावांची ओळख राष्ट्रीय स्तरावर होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील,” असे जिल्हाधिकारी पाटील यांनी म्हंटले.