पौष्टिक तृणधान्य महोत्सवात नाचणी, दोडक भात अन् मूग; महिला शेतकऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

0
427
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । राज्य शासन कृषी विभागामार्फत पोलिस करमणूक केंद्राच्या अलंकार हॉलमध्ये शुक्रवारी पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते काल करण्यात आले. या महोत्सवात पौष्टिक तृणधान्य महोत्सवात देशी नाचणी, वरी, मूग, उडीद, काळ्या घेवड्यासंह अनेक तृणधान्ये आकर्षण ठरत होते.

याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी शेतकरी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील म्हणाले, ‘सध्याच्या धावपळीच्या युगात लोकांचे जीवनमान तसेच खानपानमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. नागरिकांनी दैनंदिन आहारात पौष्टिक तृणधान्यांचा समावेश करणे आवश्यक आहे.’

याशनी नागराजन म्हणाल्या, पौष्टिक तृणधान्यांचा आहारामध्ये समावेश केल्यास मधुमेह, बद्धकोष्ठता, आतड्यांच्या आजारास प्रतिबंध होतो, तसेच तृणधान्यांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने मधुमेह, – हृदयविकार, अॅनिमिया, उच्च रक्तदाबरोधक मानले जातात.’ या महोत्सवामध्ये जिल्हाधिकारी संतोष पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनीही ज्वारी, लाल व दोडक भात, सेंद्रिय हळद खरेदीही केली. दि. २१ ते २३ मार्च या कालवधीत पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचे आयोजन केल्याचे भाग्यश्री फरांदे यांनी सांगितले.