शंभूराज देसाई मालकमंत्री की पालकमंत्री? संजय राऊतांनी डागली तोफ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड । शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) हे पालकमंत्री आहेत कि मालकमंत्री? असा सवाल करत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार निशाणा साधला आहे . तसेच येत्या निवडणुकीत तुम्ही पराभूत होणारच आहात असा इशाराही त्यांनी दिला. संजय राऊत आज कराड आणि पाटण दौऱ्यावर असून कराड येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मी म्हणजे सर्वस्व, मी म्हणजेच मालक हे कधी दिल्लीत चाललं नाही ते मग गल्लीत काय चालणार? इथे कोणीही मालक होऊ शकत नाही. या देशात लोकशाही आहे. आपण आधी पराभूत झालात, परत जिंकलात, परत पराभूत झाला आणि नंतर जिंकलात आणि आता परत तुम्ही पराभूत होणार आहात कारण हि लोकशाही आहे असं संजय राऊत म्हणाले. मी म्हणजे सरकार, मी म्हंणजे राज्य असं कोणाला वाटलं तर जनता त्याला घरी पाठवते, आणि पाटणमध्ये ही वेळ आली आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली.

शंभूराज देसाई ज्यांचा वारसा सांगतात ते त्यांचे आजोबा बाळासाहेब देसाई यांना जनता लोकनेते का म्हणत होते याचा या बालक, पालकमंत्र्यांनी अभ्यास करावा. बाळासाहेब देसाई हे फक्त साताऱ्याचे नेते नव्हते तर संपूर्ण राज्याचे नेते होते. लोकनेता कसा असावा याचे उदाहरण म्हणून आजही आम्ही अनेकांना बाळासाहेब देसाई यांचे नाव सांगतो याची आठवणही संजय राऊत यांनी करून दिली.