कोरेगावच्या बदल्यात सातारा मतदारसंघ का घेतला?; संजय राऊतांनी सांगितलं अदलाबदलीचं ‘हे’ कारण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील कोरेगाव मतदारसंघात शरद पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध एकनाथ शिंदेंची शिवसेना अशी थेट लढत होणार आहे. याबाबत आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नेमकं कारण सांगितलं आहे. कोरेगावची जागा राष्ट्रवादीला देऊन त्याबदल्यात आम्ही सातारची जागा घेतली. अनेक तास चर्चा करुन आम्ही यादी जाहीर केली आहे. तीन पक्ष सोबत असल्याने काही जागांवर तिढा असणारच. महाविकास आघाडीतील जागा वाटप एवढे सोपे नाही. कोरेगावात राष्ट्रवादीकडे शशिकांत शिंदेंसारखा तगडा उमेदवार असल्याने ती जागा त्यांना देण्यात आली असल्याचे राऊत यांनी म्हंटले आहे.

खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सातारा आणि कोरेगाव विधानसभा मतदार संघातील जागावाटप संदर्भात महत्वाची माहिती दिली. यावेळी राऊत म्हणाले, अनेक तास चर्चा करुन आम्ही यादी जाहीर केली आहे. तीन पक्ष सोबत असल्याने काही जागांवर तिढा असणारच. महाविकास आघाडीतील जागा वाटप एवढे सोपे नाही. कोरेगावात राष्ट्रवादीकडे शशिकांत शिंदेंसारखा तगडा उमेदवार असल्याने ती जागा त्यांना देण्यात आली.

तीन पक्षांनी मिळून, बसून बारा-बारा तास चर्चा करून यादी जाहीर केली आहे त्यामुळे नाराजी कुठेही नाही. तिढा असणारचं, तीन पक्ष सोबत आहेत, कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असतात, असंही त्यांनी म्हटलं. दोन पक्ष असल्यावर ठीक, पण तीन पक्ष असल्यावर प्रत्येकाला वाटत आपणच जागा जिंकणार, महाविकास आघाडीत जागा वाटप करणे इतकं सोप्प नसतं

मागील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला होता. मात्र, लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये त्यांनी भाजप उमेदवार उदयनराजे भोसले यांना चांगलीच टक्कर दिली होती. या मतदारसंघातून उदयनराजेंना १०३९२२ तर शशिकांत शिंदेंना ९७०८७ मते मिळाली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शशिकांत शिंदे आणि महेश शिंदे या दोन शिंदेंमध्ये चुरशीची लढत होईल यात शंका नाही. आमदार महेश शिंदे यांनी जवळपास सात हजारांचे लीड महायुतीच्या उमेदवाराला मिळवून दिले. परंतु, कोरेगावची जागा आम्ही राष्ट्रवादीला सोडली असून, त्याबदल्यात ठाकरे गट सातारा मतदारसंघातून लढणार असल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली.