सातारा प्रतिनिधी । सातारा – कोरेगाव रस्त्यावर संगमनगर जवळ ट्रकला ओव्हरटेक करताना ट्रकच्या पुढील चाकाखाली सापडून एका १९ वर्षीय तरूणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली होती. दरम्यान, भाचीच्या अंत्यसंस्कारावेळी चुकत मामाचाही हदयविकाराच्या धक्याने मृत्यू झाला. या दोन्ही घटनानंतर संगमनगर येथील ग्रामस्थांनी आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आक्रमक होत सातारा-पंढरपूर-लातूर राज्य महामार्गावर रास्ता रोको सुरू केला. त्यामुळे राज्यमार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या.
सातारा शहरापासून संगम माऊली पर्यंत बनवलेल्या पट्ट्यात निकृष्ट दर्जाचा रस्ता तयार करण्यात आला असून या ठिकाणी 22 अधिक लोकांचा मागील काही वर्षात मृत्यू झाला आहे. याबाबत वारंवार प्रशासनासोबत निवेदन देऊन देखील प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत असून या सर्व घटनेला जबाबदार संबंधित ठेकेदार आणि कंपनी आहे. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतिने करण्यात आली.
दरम्यान, ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्यामुळे या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला आहे. तर ग्रामस्थांकडून राज्य महामार्ग राखून धरन्यात आला.