आई-बापासह दोन मुलं विकायचे दारू; पोलिसांनी जिल्ह्यातूनच केलं तडीपार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हयातील भुईंज परिसरात बेकायदा दारुची चोरटी विक्री करणाऱ्या एकाच कुटूंबातील चार जणांच्या टोळी विरुद्ध सातारा पोलीसांनी तडीपारीची आदेश जारी केला आहे. याबतचा आदेश स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी काढला आहे.

1) टोळीप्रमुख अशोक वामन जाधव, (वय 55), टोळी सदस्य 2) सविता अशोक जाधव (वय 48), 3) अमर अशोक जाधव, (वय 23), 4) अमित अशोक जाधव, (वय 19 , सर्व रा. देगांव, ता. वाई जि. सातारा) अशी तडीपार केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सातारा जिल्हयामध्ये टोळीने बेकायदा दारुची चोरटी विक्री करणे, गंभीर दुखापत पोचवणं बाबतचं टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांच्यावर गुन्हे दाखल होते. भुईंज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांनी सदर टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 प्रमाणे सातारा जिल्हयातुन तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांच्याकडे सादर केलेला होता.

सदर प्रस्तावाची चौकशी वाईचे उपविभागीय अधिकारी बी. वाय. भालचंग यांनी केली होती. यातील टोळीमधील इसमांना दाखल असले गुन्ह्यामध्ये त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करूनही ते जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांच्यावर वेळोवेळी करण्यात आलेल्या प्रतिबंधक कारवाईचा कोणताही परिणाम झाला नाही. तसेच त्यांच्या गुन्हेगारीकरणामध्ये सुधारणा झालेली दिसून आली नसल्यामुळे ते सातत्याने गुन्हे करीत होते.

त्यांच्यावर कायद्याचा कोणताच धाक न राहिल्याने अशा गुन्हेगारांवर सर्वसामान्य जनतेमधून कडक कारवाई करण्याची मागणी होत होती. वरील टोळीला पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या समोर हजर करून यावर सुनावणी झाली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अन्वये सातारा जिल्हयातून 2 वर्षाकरीता हद्दपारीचा आदेश पारीत करण्यात आला. नोव्हेंबर

14 उपद्रवी टोळ्यांमधील 46 इसमांना तड़ीपार

2012 पासून 14 उपद्रवी टोळ्यांमधील 46 इसमांना तड़ीपार करण्यात आले आहे. भविष्यातही जिल्हयामधील सराईत गुन्हेगारांचेविरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करण्यात येणार आहेत. या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस उपनिरीक्षक मधुकर गुरव, पोलीस हवालदार प्रमोद सावंत, पो.कॉ. केतन शिंदे, म.पो.कॉ. अनुराधा मणम, भुईंज पोलीस ठाण्याचे पो.कॉ सोमनाथ बल्लाळ, सागर मोहोंचे यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.