सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने (Satara Police Bharti) २३५ पदांसाठी उद्या दि. 19 बुधवारपासून भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सकाळी सात वाजल्यापासून ते सायंकाळी उशिरापर्यंत भरती प्रक्रिया येथील पोलिस कवायत मैदानावर सुरू राहणार आहे. पोलिस दलातील विविध पदांसाठी तब्बल 1 लाख 30 हजार ३० उमेदवारांनी अर्ज भरल्याची माहिती पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी साताऱ्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शेख म्हणाले, ”पोलिस दलात २३५ पदांमध्ये ३९ पदे ही चालक पदासाठी, तर पोलिस कॉन्स्टेबल व बँड वादकांसाठी एकूण १९६ पदे आहेत. उमेदवारांनी ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्याची प्रवेशपत्र त्यांना तत्काळ दिले जाणार असून, शैक्षणिक कागदपत्रे तपासण्यासाठी चार टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. शैक्षणिक प्रमाणपत्रांचे दोन छायांकित संच, सहा पासपोर्ट साईज फोटो व जात प्रमाणपत्र या भरतीसाठी अनिवार्य आहे. (Satara Police Bharti)
तसेच उमेदवारांनी साताऱ्यासह अन्य जिल्ह्यांमध्ये प्रवेश भरतीसाठी अर्ज केला असल्यास व एकाच दिवशी अन्य ठिकाणची मैदानी चाचणी असल्यास त्या उमेदवारांना दुसरी तारीख देण्यात येईल. कागदपत्रांची छाननी त्यानंतर शारीरिक क्षमता चाचणी, तसेच १६०० मीटर धावणे, १०० मीटर धावणे व गोळाफेक अशा निकषांमधून पार पडलेल्या उमेदवारांची पोलिस दलाच्या संकेतस्थळावर गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. (Satara Police Bharti)
https://www.facebook.com/100066721152780/videos/3325670451060925
‘ही’ महत्वाची पदे भरली जाणार…
१) चालक : ३९
२) पोलिस कॉन्स्टेबल व बँड वादक : १९६
आवश्यक कागदपत्रे
१) शैक्षणिक प्रमाणपत्रांचे दोन छायांकित संच
२) सहा पासपोर्ट साईज फोटो
३) जात प्रमाणपत्र