सातारा प्रतिनिधी । नोव्हेंबर महिन्यामध्ये पाचगणी पोलिस ठाण्याने उत्कृष्ट काम करून दुसऱ्यांदा दोषसिद्धी प्राप्त करीत अव्वल दर्जाचे काम केले. याबद्दल पाचगणी पोलिस ठाण्याचे प्रभारी तथा पोलिस निरीक्षक राजेश माने व त्यांच्यासह अंमलदारांचा सातारा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
प्रत्येक महिन्यात जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख हे जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्याच्या मासिक कामकाजाचा आढावा घेत असतात, यामध्ये कर्तव्यदक्ष काम करणाऱ्या पोलिस ठाण्यांना गौरविण्यात येते. नोव्हेंबर महिन्यामध्ये पाचगणी पोलिस ठाणे पुन्हा उत्कृष्ट ठरले आहे.
पाचगणी पोलिस ठाण्याने सर्वात जास्त दोषसिद्धी प्राप्त करून संपूर्ण जिल्ह्यात सर्वोत्तम कामगिरी करीत उत्कृष्ट ठरले आहे. याबद्दल सातारा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक समीर शेख याच्या हस्ते पाचगणी पोलिस ठाण्याचे प्रभारी तथा पोलिस निरीक्षक राजेश माने यांच्यासह ठाणे अंमलदारांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक आंचल बादल उपस्थित होत्या.