संभाजी काकडे यांची बाजार समितीच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | शेती उत्पन्न बाजार समिती कराडच्या उपसभापतीपदी कराड तालुक्यातील कोरेगाव गांवचे संभाजी श्रीरंग काकडे
यांची बिनविरोध निवड करणेत आली. उपसभापती पदाकरिता नुकत्याच झालेल्या निवडणुकीत एकच अर्ज आल्याने निवडणूक निर्णय तथा अध्यासी अधिकारी यांनी निवड बिनविरोध झाल्याचे घोषित केले.

सदर निवडणूक कामी निवडणूक निर्णय अधिकारी तथा अध्यासी अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक सह.संस्था कराड चे संजय जाधव तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही. बी. मोरे यांनी काम पाहिले.

उपसभापती निवडीच्या सभेस सभापती प्रकाश पाटील, संचालक नितीन भिमराव ढापरे, विजयकुमार कदम, सर्जेराव गुरव, राजेंद्र चव्हाण, शंकरराव उर्फ सतिश इंगवले, जयंतीलाल उर्फ मनूभाई पटेल, जगन्नाथ लावंड आदी संचालक उपस्थित होते.

निवडीनंतर नवनिर्वाचित उपसभापती संभाजी काकडे यांनी स्व यशवंतराव चव्हाण, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यावेळी बोलताना काकडे म्हणाले, कराड बाजार समिती राज्यात नावारूपास आलेली बाजार समिती आहे. काकांनी घालून दिलेले आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करणार असून आमचे नेते माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली संचालकांना सोबत घेऊन शेतकरी हितासाठी कटिबद्ध राहणार आहे.

निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद व्यक्त केला. कराड तालूक्याच्या सहकारातील शिखर संस्था म्हणून कराड शेती उत्पन्न बाजार समितीचा नावलोकिक आहे.या संस्थेच्या उपसभापतीपदी प्रथमच इतर मागास प्रवर्गातील उमेदवाराची निवड झाल्याने या समाजासह तालुक्यातून आनंद व्यक्त होत आहे.