Salman Khan : सलमान खानचा मुक्काम महाबळेश्वरमधील वाधवानच्या बंगल्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वर येथील वाधवान बंगल्यात बुधवारी रात्री सुपरस्टार सलमान खानने (Salman Khan) ताफ्यासह पाहुणा म्हणून दाखल होत पाहुणचार घेतल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे सलमान ज्या बंगल्यात थांबला आहे तो देशातील मोठ्या आर्थिक घोटाळ्यातील मुख्य आरोपी येस बँक घोटाळ्याचे डीएचएफएल उद्योग समूहाचे उद्योगपती कपिल वाधवान व धीरज वाधवान बंधूंचा आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, देशभरातील पर्यटकांसह दिग्गज राजकीय नेत्यांपासून कलाकारांना भुरळ घालणाऱ्या या निसर्गरम्य महाबळेश्वर नगरीमध्ये उद्योगपती वाधवान यांचा दिवाण व्हिला हा आलिशान बंगला गेली अनेक वर्षे आहे. हा ‘दिवाण व्हिला’ बंगला कोरोना काळात वाधवान बंधूंचे शेवटचे एकत्रित वास्तव्य ठरले महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेपासून अंदाजे १ कि.मी. अंतरावर वाधवान कुटुंबीयांच्या मालकीचा ‘दिवाण व्हिला’ हा आलिशान बंगला आहे.

सध्या महाबळेश्वर शहर परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असून, धुक्याचे प्रमाण देखील जास्त आहे. अशा वेळी सुपरस्टार सलमान खान शूटिंगसाठी बुधवारी येस बॅँक प्रकरण घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेल्या वाधवान यांच्या बंगल्यात फौजफाट्यासह पाहुणचार घेत आहे. दरम्यान, वाधवान यांच्या बंगल्यात सलमान खान थांबला कसा? सलमान खान (Salman Khan) व वाधवान यांचे काय संबंध?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शुटींगसाठी सलमान महाबळेश्वरमध्ये 

दरम्यान बॉलीवूडचा भाईजान हा आगामी सिनेमाच्या शुटींगसाठी महाबळेश्वरमध्ये पोहचला असल्याची माहिती मिळाली आहे. पण वाधवानच्या बंगल्यात वास्तव्य केल्यामुळे साऱ्यांच्याच भुवया उंचावल्यात. त्यामुळे सलमानने वास्तव्यासाठी हाच बंगला का निवडला? हे पाहणं गरजेचं ठरेल.

वाधवनचा नेमका वाद काय?

डीएचएफएल प्रकरणात वाधवान बंधू वादाच्या अडकले. 17 बँकांचे 34 हजार कोटी रुपये बुडवल्याचा आरोप या दोन्ही भावंडांवर करण्यात आला आहे. त्यानंतर वाधवान बंधूंना सीबीआयकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर लॉकडाऊनमध्ये या भावंडांचा मुंबई ते महाबळेश्वर प्रवास वादात आला होता.