साताऱ्यात फटाके विक्रीच्या परवानगीवर निघाला तोडगा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । दिवाळी तोंडावर आली असताना फटाके विक्रीची परवानगी मिळत नसल्याने फटाके विक्रेते हतबल झाले होते. मात्र, गुरुवारी तहसीलदारांनी फटाके विक्रीचा परवाना देण्याचे मान्य केल्यानंतर फटाके विक्रेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

साताऱ्यातील माची पेठेमध्ये काही दिवसांपूर्वी फटाक्यांच्या दारूचा भीषण स्फोट झाला होता. यामध्ये एकाला आपला जीव गमवावा लागला होता. तर चौघे जण गंभीर जखमी झाले होते. या स्फोटानंतर पोलिसांनी तपास केल्यानंतर संबंधित व्यक्तीने विनापरवाना बेकायदेशीर मार्गाने दारूसाठा आणल्याचे स्पष्ट जाले होते. त्यानंतर प्रशासनाने विनापरवाना फटाके स्टॉलधारकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. काही जणांवर गुन्हे देखील दाखल केले.

परंतु, जे पूर्वीपासून वर्षानुवर्षे शासनाच्या परवानगीने फटाके विक्रीचा व्यवसाय करताहेत त्यांच्यावर या कारवाईमुळे अन्याय होऊ लागल्याची भावना निर्माण होऊ लागली होती. दिवाळी काही दिवसांवर आली असताना शासनाकडून परवाना मिळत नव्हता. मात्र, गुरुवारी फटाके असोसिएशन आणि तहसीलदारांशी चर्चा झाल्यानंतर यातून तोडगा निघाला.