सातारा प्रतिनिधी । मणिपूर मधील महिलांवरील अत्याचाराच्या घडलेल्या घटना या मानवी संस्कृतीला काळिमा फासणाऱ्या आहेत. या घटनेबाबत निषेध व्यक्त करण्यासाठी सातारा येथे उद्या सोमवार दि. 31 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी 11 वाजता निषेध व सहवेदना मोर्चा काढण्यात येणार आहे. उद्याच्या मोर्चात जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहवेम अशी मागणी राष्ट्रीयता जागर अभियान यांच्या वतीने करण्यात आली आहे.
उद्या सोमवार, दि. 31 ऑगस्ट 23 रोजी सकाळी 11 वाजता राजवाडा (गोलबागेपासून) खालील रस्त्याने (कर्मवीर भाऊराव पाटील पथ) हा मोर्चा काढला जाणार आहे. मोर्चाच्या वतीने पोलिस अधिक्षक व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. मोर्चाच्या अग्रभागी तिरंगा ध्वज असणार आहे.
दरम्यान, मणिपूरमध्ये आदिवासी आणि बिगर आदिवासींमध्ये झालेल्या संघर्षातून दोन आदिवासी महिलांवर झालेल्या अत्याचाराचे प्रकरण समोर आल्यानंतर देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्रातही या घटनेच्याविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. नंदूरबार, सोलापूर, गोंदिया, बीड अशा विविध जिल्ह्यांमध्ये निदर्शने, मोर्चाच्या माध्यमातून अत्याचाराचा निषेध करण्यात आला आहे.