सातारा प्रतिनिधी | भारतीय क्रिक्रेट संघाचे माजी कर्णधार सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) यांनी म्हसवड येथे माणदेशी चॅम्पियन्सच्या (Mandeshi Champion) क्रीडा संकुलाच्या आधुनिक स्टेडियमचे उद्घाटन काल मंगळवारी केले. माणदेशी चॅम्पियनच्या प्रशिक्षणार्थी खेळाडूंशी त्यांनी संवाद साधला. याबरोबरच मुलांसमवेत सचिनने आणि मुलगी सारा हिने रस्सीखेच खेळातही सहभाग घेतला.
सातारा जिल्ह्यात म्हसवड येथे चेतना सिन्हा (Chetna Sinha) यांच्या माणदेशी फाउंडेशन (Mandeshi Foundation) संचलित माण देशी चॅम्पियन्सच्या क्रीडा संकुलनास सचिन तेंडूलकर यांनी पत्नी अंजली आणि मुलगी सारा यांच्यासोबत भेट दिली. म्हसवड येथे मेगा सिटीत नव्याने तयार केलेल्या आधुनिक स्टेडियमचे उद्घाटन सचिन तेंडूलकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यानंतर क्रीडा संकुलातील मैदानावर क्रीडा प्रशिक्षणासाठी असलेल्या नवोदित खेळाडूंशी सचिन तेंडुलकर यांनी संवाद साधला. यावेळी माण देशी फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा चेतना सिन्हा, माण देशी चॅम्पियन्सचे अध्यक्ष प्रभात सिन्हा जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख उपस्थित होते.